शहरं
Join us  
Trending Stories
1
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
2
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
3
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
4
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
5
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
6
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
7
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
8
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
9
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
10
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
11
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
12
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
13
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
14
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
15
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
16
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
17
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
18
अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क
19
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू आणि अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:42 IST

जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता.

जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता. मृत्यू ही काही अशी गोष्ट नाहीये जी तुमच्यासोबत भविष्यात घडणार आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा सोबत अर्धा मृत्यूही झाला. फक्त राहिलेला अर्धा भाग घडणं अजून बाकी आहे एवढंच. नि:शंकपणे एक दिवस ते पूर्ण होणार आहे. जीवन आणि मृत्यू या विभिन्न प्रक्रि या नाहीत. त्या आपसात एकमेकांत खोलवरगुंतल्या आहेत. जीवन आणि मृत्यू या दोन्ही प्रक्रिया तुमच्या आत प्रत्येक क्षणी घडत आहेत. तुमची अवघी श्वसन क्रिया, तुम्ही आत घेत असलेला प्रत्येक श्वास म्हणजे जीवन आहे आणि बाहेर सोडलेला प्रत्येक श्वास हा मृत्यू आहे. जर तुम्ही पुढचा एक श्वास आत घेतला नाही म्हणजे तुम्ही मरण पावलात. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा सर्वात पहिली गोष्ट तुम्ही केलीत ती म्हणजे प्राणवायू आत घेतलात आणि आयुष्यात तुमच्या हातूनसर्वात शेवटची केली जाणारी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवटचा श्वास बाहेर सोडणार. आयुष्य निरंतर अनिश्चित आहे. मृत्यू मात्र शंभर टक्के निश्चित आहे, यात अजिबात शंका नाही. जीवनाबद्दल तुम्हाला लाखो शंका असू शकतात. ‘मी श्रीमंत होईन की नाही?’, ‘मी सुशिक्षित होईन की नाही?’, ‘मी आत्मज्ञानी होईन की नाही? वगैरे’. पण मृत्यूबाबत मुळीच कोणतीही शंका नाहीये. तर मग निश्चित, अटळ गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टींचं ओझं डोक्यावर ठेवून बसण्यात काय अर्थ आहे? आध्यात्मिक प्रक्रिया तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही मर्त्य आहात याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही देवाचा विचार करत आहात म्हणून तुम्ही आध्यात्मिक होत नाही. तुम्ही ईश्वराचा शोध घेता कारण तुम्हाला खूश राहायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट चालवायचा असतो किंवा तुम्हाला स्वर्गात जायचं असतं. कारण तुमचं आयुष्य तुम्ही नरक बनवलंय म्हणून. आपण मर्त्य आहोत याची जाणीव झाल्यावरच तुम्ही आध्यात्मिक बनता.- सद््गुरू जग्गी वासुदेव