शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मनाची एकाग्रता महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 07:22 IST

विश्वामध्ये अशा काही शक्ती आहेत त्या गुप्तरुपाने वावरत असतात, तर काही प्रकट रुपाने दिसतात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजविश्वामध्ये अशा काही शक्ती आहेत त्या गुप्तरुपाने वावरत असतात, तर काही प्रकट रुपाने दिसतात. ग्रह किंवा उपग्रह या दोन्ही भागात त्यांचे विभाजन केले जाते. ज्या शक्तीचा आंतरिक आकार छोटा परंतु घनत्व असते यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगल इत्यादी गोष्टींचा उल्लेख करता येईल. त्यात दुसरा भाग घनत्व कमी असेल परंतु आकार मोठा असेल यात ब्रहस्पती-शनि इत्यादी... अशा ग्रहशक्ती शोधायला मनाची परिपक्वता लागते. त्या ग्रहांची स्थिती, त्यांची गती, त्यांचा प्रभाव याचा शोध घ्यायला मनाची अवस्था कामी येते. ‘मन’स्थिती ठीक नसेल तर त्याचे अनुमान काढता येणार नाही. मनाची एकाग्रता महत्त्वपूर्ण मानली जाते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो. त्या पृथ्वीवरील भूभागावर चंद्राला सूर्य ढकलतो. तेव्हा सूर्यग्रहणाची निर्मिती होते. अशा ग्रहणाचा अभ्यास करायला मनाची स्थिरता महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण चंद्र हा प्रकाशहीन आहे. तो सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असतो. कारण चंद्राच्या गतीवरच सूर्याची आणि पृथ्वीची सापेक्ष स्थिती बदल राहाते. चंद्राचा आणि मनाचा संबंध जवळचा आहे. मनाच्या स्थितीवरून आत्मस्वरुपाची व बुद्धीची गती-विधी बदलत राहाते. या सर्वांना कारणीभूत मनाची आंतरिक ऊर्जा अस्तित्वात असते. शरीरातील मनाचा, पृथ्वीवरील भूभागाचा आंतरिक प्रक्रियेवर परिणाम होतो. ज्याप्रमाणे भूभागाचा आंतरिक प्रक्रियेवर परिणाम होतो. तापमान, दबाव, घनत्व यानुसार पृथ्वीच्या आंतरिक प्रक्रियेची जाणीव होते त्याप्रमाणे मनावरून त्याच्या बुद्धी व चित्ताची व आत्म्याची जाणीव होऊ शकते. मनुष्याच्या आंतर प्रक्रियेत जसा बदल घडतो तोच ग्रहशक्तीच्या हालचालींवरून सृष्टीत घडत असतो. जसा भूगर्भात बदल झाले की भूकंप होतो. तसा मनात विकृती आली की क्रोधरूपी भूकंप होतो आणि काही जणाचे प्राण जातात किंवा वास्तविक संतुलन बिघडते. ग्रहांची स्थिती, तीच मनाची स्थिती असते. त्यानुसार सृष्टीत व मनात बदल घडत असतात.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक