शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 19:30 IST

वारी.. एक तप !

पंढरीची वारी हे एक तप असून, आनंद प्राप्तीसाठी पत निर्माण करणारे माध्यम आहे. वारीत चालत असताना भाविकांकडून कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारचे तप घडते. पायी चालत राहिल्याने कायिक तप घडते. शिवाय शरीराकडून वेगवेगळी सेवा घडत राहिल्याने ते एक प्रकारचे कायिक तप घडते. हाताने टाळी, मुखाने भजन हे तप घडण्यासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे वारी आहे.

लागोनिया पाया विनवीतो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम’ या संतवचनाप्रमाणे आपण साधना केली तर आपल्याकडून तप घडेल म्हणून वारीची परंपरा सुरु केली. प्रत्येक व्यक्तीकडून दररोज दहा प्रकारचे पाप घडत असते. कायिक तीन, वाचिक चार, मानसिक तीन असे एकूण दहा प्रकारचे पाप घडत असते . पापाचे फळ दु:ख असून, पुण्याचे फळ सुख आहे. सुखाची प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते, परंतु पुण्य करावे वाटत नाही. मला दु:ख व्हावे असे म्हणणारा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती भेटत नाही. तरी कोणाचेही दु:ख गेलेले पाहावयास मिळत नाही. कारण दु:खाचे मूळ पाप असून, ते कोणालाही चुकविता येत नाही.

पापाचे डोंगरच्या डोंगर प्रत्येकाच्या कर्मातून पाहावयास मिळतात. पाप दाखविण्यासारखी वस्तू नसून, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या वेदना होतात त्या पापामुळेच होतात. निषिद्ध कर्म म्हणजे चुकीचे कर्म, कर्तव्य विन्मुख कर्म याला पाप म्हणतात. या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी तप खूपच गरजेचे आहे. हे तप घडण्यासाठी वारी करावी लागते. ब्रह्मदेवालाही सृष्टी निर्माण करण्याअगोदर तप करावे लागले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहण्यासाठी लागणाºया पुण्याचा विचार मांडत असताना मला तप करावे लागले होते, असे नमूद केले आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये तपाची खूपच आवश्यकता असते. वारीमध्ये भाविकांकडून सहज तप घडते. तपासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही. वारी म्हणजेच एक तप आहे. यामध्ये कायिक तपाबरोबर वाचिक तप घडते. मुखाने नामस्मरण करणे हे वाचिक तप ठरते. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ ग्रंथातून संदेश दिला, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ वारीमध्ये नामस्मरण, भजनासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही.मनही या सर्व सेवेत रममाण झालेले असते. मनाचा स्पर्श साधनेला असल्यामुळे ते एक प्रकारचे मानसिक तप घडते. मुखाने भजन, कीर्तन सतत घडत राहिल्याने मनाचा स्पर्श साधनेला होतो व त्याचे रूपांतर तपात होते.

तपश्चर्येचे निर्माण झालेले बळ जीवन जगत असताना खूपच उपयोगाचे ठरते. कोणतेही कार्य करत असताना त्याला लागणारी ऊर्जा सात्विक असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पडते़ या सात्विक ऊर्जेला वारकरी संप्रदायामध्ये तप असे संबोधले गेले आहे़ असे तप आपल्याकडून घडावे या भावनेतून वारकरी कधीच वारी करत नाहीत. परंतु त्यांच्याकडून वारी केल्यानंतर तशा प्रकारचे तप घडते. आणि त्या तपाचा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये व सेवेमध्ये साधनेलाही उपयोगी ठरतो म्हणून निष्ठेने वारकरी पंढरपूरची आषाढी वारी करतात.- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा