शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी हाल होत असल्याने भिल्ल समाजबांधवांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:50 IST

मेहुणबारेत स्मशानभूमीचा वाद : ग्रा. पं. कार्यालयासमोरच नेले खड्डा खणण्याचे साहित्य

मेहुणबारे, ता.चाळीसगाव - येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीच्या वादावरून अंत्यसंस्कारासाठी नेहमीच हाल होत असल्याने संतप्त झालेल्या भिल्ल समाजाच्या शेकडो ग्रामस्थांनी अंत्ययात्रेसाठी थेट ग्रामपंचायत कार्यालय आवारातच खड्डा खोदण्यासाठी तेथे धडक दिली. या ठिकाणी त्यांनी तब्बल तीन तास ठिय्या मांडला. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या या घटनेने वातावरण तापले होते.येथील नवेगाव भागातील इंदिरा नगरमध्ये सोमवारी भिल्ल समाजातील उत्तम आनंदा सोनवेण (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या भिल्ल समाज बांधवांनी टिकाव व फावडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले व ग्रामपंचायतीच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा निश्चय केला यामुळे एकच खळबळ उडाली होती.भिल्ल समाजातील स्मशानभूमीच्या वादाचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून सुटत नसल्याने त्यांना अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याने यावेळी समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली.आश्वासनानंतर ठिय्या मागेया घटनेची माहिती तालुका प्रशासनाला कळताच घटनास्थळी ग्रामविस्तार अधिकारी रांजेद्र पाटील, मंडळधिकारी गणेश लोखंडे, सरपंच संघमित्रा चव्हाण, यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमीसाठी असलेली जागा लवकरच देण्यात येईल. त्या जागेची मोजणी करून तेथील अतिक्रमण हटवून ती जागा भिल्ल समाज बांधवांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचातीतर्फे दिल्यानंतर उपस्थित भिल्ल समाज बांधवांनी माघार घेतली. त्यानंतर मृत व्यक्तीवर तिरपोळे रस्त्यालगत असलेल्या जागेवर अंत्यंस्कार करण्यात आले.स्मशानभूमीचा प्रस्ताव मार्चपासून तहसीलदरांकडेमेहूणबारे येथे अनेक वषार्पासून भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. मेहूणबारे ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३९६ मध्ये भिल्ल समाजातील स्मशानभूमीसाठी ८० आर जागा दिली असल्याचा ठराव २५ जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत केला होता. या प्रकरणात मंडळाधिकारी गणेश लोखंडे यांनी भिल्ल समाजाच्या अंत्यविधी करण्याच्या जागा मागणीचा प्रस्ताव मार्च २०१९ मध्येच तहसिलदार यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती लोंखडे यांनी बोलतांना दिली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव