शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

‘मारो गरबो घुमतो जाय!’ दुर्गामातेची पूजा करून, तिच्यासमोर पाचवी माळ बांधावयाचा दिवस

By दा. कृ. सोमण | Published: September 25, 2017 7:07 AM

गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल.

गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल. आता नवरात्र उत्सव हा काही केवळ धार्मिक राहिलेला नाही. तर तो सांस्कृतिक, सामाजिक झाला आहे. आजआपण गरबा नृत्याबद्दल आणि त्या वेळी गायल्या जाणा-यागीतांबद्दलही माहिती करून घेणार आहोत.गरबा नृत्यगरबा हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. गरबा शब्दाचा उच्चार ‘गरबो’ असाही केला जातो. राजस्थानमध्येही गरबानृत्य प्रसिद्ध आहे. गरबा या लोकनृत्याला आता आधुनिक नृत्यकलेत स्थान मिळालेले आहे. या नृत्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि नृत्य पाहण्यासाठी अनेक लोक तिकीट काढून जात असतात.पूर्वी नवरात्रांत देवीजवळ सच्छिद्र घटात अखंड दीप लावून ठेवीत असत. त्या घटाला ‘दीपगर्भघट’ असे म्हणत. या दीपगर्भ शब्दातील काही वर्णांचा लोप होऊन ‘गरबा’ हा शब्द राहिला, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी बायकांचा गरबा नवरात्रांत नऊ दिवस चालतो. नंतर पुरुषांचा गरबा दस-यापासून सुरू होतो.गरब्याची गीतेगरब्याच्या वेळी सुमधूर गीते सुंदर तालात म्हटली जातात. देवीची पारंपरिक गीते म्हटली जातात. त्याचप्रमाणे कृष्णलीलेचीही गाणी म्हटली जातात.मीरेप्रमाणे गोकुळातील सामान्य स्त्रीही गोकुळातल्या कान्ह्याला ‘कलेजारी कोर’ म्हणजे ‘काळजाचा तुकडा’ असे म्हणते. उदाहरणासाठी एक प्राचीन पारंपरिक रचनाच देतो.‘तांबा का लोटया भरया जलसे रे।पीवानो वालो परदेश छे रे।।बई, म्हारो कान्हो कलेजा री कोर छे रे।कोर छे, कोर छे, कोर छे रे।बई, म्हारी सोना री अंगुठी उपरमोर छे रे।।याचा अर्थ असा आहे की, तांब्याचा लोटा पाण्याने भरला; पण ते पाणी पिणारा मात्र परदेशात आहे. माझा कान्हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. बाई, माझ्या सोन्याच्या अंगठीवर मोर आहे. माझा कान्हा ‘कलेजारी कोर’ आहे.गरबी आणि गरबागरब्याचे ‘गरबा’ आणि ‘गरबी’ असे दोन प्रकार आहेत, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. ‘गरबी’ ही साधारणत: वैष्णवांची आहे. त्यामुळे ‘गरबी’मध्ये राधाकृष्णाचे वर्णन केलेले असते. ‘गरबा’ हा सामान्यत:: शाक्त म्हणजे, शैव पंथीयांचा समजतात. गरबा गीते अंबाजी, बहुचरा, काली अशी दुर्गा रूपांसंबंधी असतात. ‘गरबा’ आणि ‘गरबी’ यांच्या गायनाच्या पद्धतीमध्येही फरक आहे. देवीच्या आरतीनवरात्रांत देवीची पूजा झाल्यानंतर आरती म्हटली जाते. तबकात प्रज्वलित निरांजन देवतेला ओवाळण्याला ‘आरती’ असे म्हणतात. ‘आरती’ हा शब्द ‘आरात्रिक’ या शब्दावरून आला. आरत्यांविषयी अधिक माहिती आपण उद्या पुढील लेखात पाहू या. आज देवीला नमस्कार करून प्रार्थना करू या...सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणीनमोऽस्तु ते।। 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७