शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाचनसंस्कृती जोपासू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:06 IST

‘वाचन’ एक सवय आणि संस्कृती म्हणून जोपासणे अतिशय आवश्यक आहे.

- सद्गुरू जग्गी वासुदेव‘वाचन’ एक सवय आणि संस्कृती म्हणून जोपासणे अतिशय आवश्यक आहे. वाचनाचा प्रभाव हा व्हिडीओ पाहणे किंवा कॉम्प्युटर गेम्स खेळण्यापेक्षा अतिशय वेगळा आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात सारखेपणा नाही. वाचनामुळे तुमच्या मनाला आणि तुमच्या अंतर्दृष्टीला एक अतिशय वेगळ्या प्रकारचा व्यायाम घडतो. आजच्या तरुण पिढीला व्हिडीओ पाहणे किंवा अशा प्रकारच्या इतर गोष्टी करण्यापेक्षा, वाचनाची सवय लागावी, यासाठी काहीतरी पावले उचलली जातील, अशी आशा आहे. दृक्श्राव्य माध्यमांमधूनसुद्धा बरेच काही शिकायला मिळते, आणि त्यांच्या परीनं ती प्रभावीसुद्धा आहेत, परंतु वाचनात अधिक गहनता, अधिक सखोलता आहे. बहुतेक लोक आज जे काही करत आहेत, त्याऐवजी जर त्यांनी अधिक वाचन केले, जर ते एके ठिकाणी बसले आणि लक्ष केंद्रित करून वाचन केले तर ते अधिक शांत, अधिक विवेकी बनतील आणि जीवनाकडे अधिक सखोलपणे पाहतील, कारण वाचन ही एक प्रकारची ध्यान-धारणा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्याला ध्यान-धारणा म्हणतात. ही एक प्रकारची साधना आहे, कारण तुमचे मन ज्याप्रकारे कार्य करते, त्यात निश्चितपणे सुधारणा होते. इलेक्ट्रॉनिक्सचे आकर्षण वरचढ होत आहे, आणि एक समाज म्हणून, आपण वाचनाची संस्कृती गमावता कामा नये. आज लोकांची मुख्य समस्या म्हणजे, ते जीवनाकडे अधिक सखोलपणे पाहण्याची हातोटी हरवून बसले आहेत. आज लोक प्रत्येक गोष्टीकडे वरकरणी पाहतात आणि मला वाटतं की काही दृक्श्राव्य माध्यमं याला कारणीभूत आहेत. मी त्यांच्या विरोधात नाही, कारण एक माध्यम म्हणून ते खूपच चांगले आहे, पण बहुतेकदा मला असे वाटते की ते वाचनाला पर्याय होऊ शकत नाहीत.