शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही आनंद तरंग : कृष्णमूर्ति सावळा। हृदयी वसे ।।

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:57 IST

प्रेमाची कृष्ण छटा आणि ज्ञानाची शुक्ल छटा म्हणजे ज्ञान आणि प्रेम यांच्या एकवटण्याने जो रंग उभा राहतो ती पांडुरंगाची कांती होय...

- डॉ. रामचंद्र देखणे- 

पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग हा परमात्मा पंढरपुरी आला आणि भक्तिसुखात रंगून गेला. असे पंढरीचे महात्म्य आहे. ढगांमध्ये काळा ढग सुंदर वाटतो. लोकांना तो सतत छाया देत असतो. लोकांना देण्यासाठी भरून आणलेल्या जलामुळे त्याची कांती सावळी झालेली असते. दातृत्वाची सुंदरता त्यात झळाळत असते. पांडुरंगाची कांती अशीच सावळी आहे. ही नयनमनोहर सावळी कांती पाहून संत सुखावले आणि त्याच्या स्वरूपदर्शनात स्वत:लाच हरपून बसले. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले, ज्ञानदेवी निळा । परब्रह्मी गोविला । कृष्णमूर्ति सावळा । हृदयी वसे ।। भगवान विष्णूच्या प्रेमळपणातून निर्माण झालेला काळेपणा आणि भगवान शंकराच्या स्थितप्रज्ञेतून निर्माण झालेली शुभ्रता. या काळेपणाचे आणि शुभ्रतेचे मिश्रण म्हणजे पांडुरंग. प्रेमाची कृष्ण छटा आणि ज्ञानाची शुक्ल छटा म्हणजे ज्ञान आणि प्रेम यांच्या एकवटण्याने जो रंग उभा राहतो ती पांडुरंगाची कांती होय. पांडुरंग म्हणजे-ज्याचा रंग पांडू आहे तो. पांडू म्हणजे स्वच्छ, सृष्टीमध्ये भोगाचा एक वेगळा रंग आहे. पण भक्तीपुढे त्याला चकाकी नाही. भक्तीचा रंग स्वच्छ आहे. तो धारण करणारा पांडुरंग आपल्या भक्तांनाही स्वच्छ जीवनकांती देण्यासाठी उभा आहे. भक्तीच्या, विवेकाच्या आणि सदाचाराच्या रंगाने जीवनाची स्वच्छ सुंदर कांती निर्माण करायची आहे. अशी कांती असणारा पांडुरंग सौंदयार्चा गाभा आहे. ही कांती पाहून ज्ञानेश्वर माऊली हरखून गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणू लागले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फाकती प्रभा ।। विठ्ठलमूर्ती-राजस सुकुमारह्ण श्रीविठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी त्यांच्या गुणचिंतनात जीवनाची कृतार्थता अनुभवली आहे. भक्तीच्या सुखाने लाचावलेला आणि गोकुळी गोपवेशाने गाई राखणारा तो कृष्णच पुंडलिकासाठी भीवरेच्या तीरी विसावला. पंढरपूर हे सकळ तीथार्चे आणि साऱ्या मंगलाचे माहेर आहे. भक्तीसुखे लाचावला । जाऊ नेदी उभा केला ।। निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मी न विसंबे ।।पुंडलिकाच्या भेटीसाठी हा परमात्मा पंढरपुरी आला आणि भक्तिसुखात रंगून गेला. भक्तीसुखे लाचावला, जाऊ नेदी उभा केला, असे निवृत्तिदास म्हणतात.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर