शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

आनंद तरंग: विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 5:00 AM

मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे

बा.भो. शास्त्री

विचार हिच खरी माणसाची ओळख आहे. तोच वजा झाला की त्याला दोन पायाचा पशू म्हटलं जातं. याच कारणाने, सद्गुण नसलेल्या माणसाला आपण बैल, गाढव, कुत्रा म्हणत असतो व दुर्गुण संपले की आता तो माणूस झाला असं आपण म्हणत असतो. बालपणाची कोमलता निरागसता, हास्य निघून जाते, मग ‘‘रम्य ते बालपण’’ आपणच म्हातारपणी म्हणायला लागतो. त्या बालपणाचं नुतनीकरण करता येत का? कमजोर झालेला आचार व लुप्त होणारा विचार ताजा होईल का? या प्रश्नाचं उत्तर श्रीचक्रधर एका सूत्रातून देतात,‘‘परस्परें मथन किजे मग नूतन होए:’’तेच भांडं घासल्यानं चकाकतं, तेच वस्त्र धुतल्याने निर्मळ होत. तिच जागा झाडू मारला की स्वच्छ दिसते. तेच टाकाऊ टिकाऊ करता येतं. तसं जुन्याला नवं करता येत का? त्यासाठीच परस्परात विचाराचं मंथन करावं असं स्वामी म्हणतात. मंथनाशिवाय लाकडातला अग्नी व दह्यातलं लोणी बाहेर पडत नाही आणि अंतवंताचं मंथन झालं तरच अनंताची उपलब्धी असते.‘‘मंथनी नवनीता तैसे घे अनंतावाया व्यर्थकथा सांडी मार्ग’’असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. मंथन म्हणजे निकोप वादसंवाद. चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा, त्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे. केवळ जिज्ञासेने प्रगतीसाठी झालेले प्रश्नोत्तरं असतात. गीतेच्या समारोपात संजय कृष्णार्जुनाच्या संवादाचं अप्रतिम वर्णन करतो. धृतराष्ट्राचे सगळे दडपणं झुगारुन आपला समोरोपिय व अंतीम निर्णय देतो. मधूर संवादाचं अतिउत्साहाने कौतुक करतो.‘‘राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्’’केशवार्जुनयो:पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:’’अशाच प्रकारचा आनंदवर्धक संवाद स्वामींना अपेक्षित आहे. ज्या चर्चेत सुख श्रेय आणि शृंगार नाही त्याला अरण्य रुदण म्हटलं आहे. परस्परे या शब्दात दोन टोकांचं घुसळण आहे. एक सत्तापक्ष, एक विरोधीपक्ष. विरोध म्हणजे व्यत्यय दूर करणारा चुका ध्यानात आणून देणारा, भांडणारा नव्हे. त्याला बोधपक्ष असंही म्हणतात. समुद्रमंथन झालं तेव्हा असून व देव यांच्यात झालं. गीता दोघांच्या संवादातच जन्माला आली. गुरु शिष्याच्या संवादात शास्त्र तयार झालं. विचाराच्या मंथनातून सिद्धांत जन्माला आहे. कालबाह्य झालेले टाकावू टाकायचं व ग्राह्य स्वीकारायचं हाच उद्देश असतो. काही आचार विचार काल सापेक्ष स्थल सापेक्ष व व्यक्ती सापेक्ष असतात. त्यांना आपण शाश्वत करण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा अडचण होते. कधीतरी गृहित धरलेलं सत्य आज असत्य असल्याचं ध्यानात आलं तर ते नाकारता येणं यालाच विचार म्हणतात. जुन्याचा आशय तसाच ठेवून मानवतेला पुरक नवा अर्थ समाजाला देणे. अथवा ज्या शास्त्राचा विसर पडला त्याला चर्चेतून पाखडून घेण्यासाठी हे सूत्रं अवतरलं आहे. सिद्धांत नित्यनूतन वाटला पाहिजे. असा विचारविमर्ष तर घरातही महत्वाचा आहे. सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला तर, सुखकारकच असतो. जमीन घ्यायाची असेल तर सर्वांसमोर प्रस्ताव मांडा. सदस्य प्रश्न विचारतील कुठे आहे, हलकी की भारी पाणी आहे, रोडलगत आहे, मार्केट तिी दूर आहे, पैसे आहेत, हा पूर्वपक्ष आहे व याचं समर्पक उत्तर देतो याला सिद्धांत पक्ष म्हणतात. एकमताने निर्णय घेतला तर ते मंथनातून निर्माण झालेलं नूतन आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक