शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग : मोक्षप्राप्तीची साधना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 03:50 IST

‘‘पार्था, ज्या परमभक्ताचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही.

वामनराव देशपांडे

परमभक्तीचे रहस्य उलगडून सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणाले,मयासक्तमना: पार्थ योगं युज्जन्मदाश्रय:।असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्ययि तच्छृणु।।‘‘पार्था, ज्या परमभक्ताचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही. सावली जशी आपल्या देहाबरोबर असते ना, तसा माझा परमभक्त माझ्या सावलीसारखा माझ्याबरोबर असतो. तो भक्त माझ्याच सोबत राहतो. त्याला खात्री असते की, माझा आश्रय एकदा का लाभला की, मानवी आयुष्य लाभलेला तो परमभक्त कुठल्याही स्वरूपातल्या चिंता अथवा काळजीचे काळेभोर ढग त्याच्या जगत असलेल्या आयुष्यावर ओथंबून येत नाहीत. माझ्या शाश्वत अस्तित्वाशी तो सहजपणे जोडला जातो. पार्था, तू माझा तसा परमभक्त हो आणि माझ्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाला समग्रपणे जाणून घे. तू एक कायम लक्षात ठेव की, ज्या परमभक्ताचे मन माझ्यात पूर्णांशाने आसक्त झालेले आहे, जो माझाच आश्रित झालेला आहे, तो योगी पुरुष, परमात्म्याशी क्षणभर का होईना, असा वियोग होईल असे देहाशी निगडित असलेले ‘मी’ संबंधीचे कर्म करीतच नाही रे, पार्था, म्हणून तू तुझे मन, चित्त, बुद्धी, तुझी सर्व इंद्रिये माझ्यातच आसक्त कर. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी साधकापाशी अतुट श्रद्धा हवी की, या मायेने ओेथंबलेल्या मर्त्य भ्रममूलक दृश्य विश्वात परमेश्वरी तत्त्व फक्त सत्य आहे. हे सत्य एकदा का जाणिवेच्या पातळीवर आपल्या अंत:करणात स्थिर झाले की खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षप्राप्तीच्या साधनेला सुरुवात होेते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक