शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म- भाषा सौंदर्य- अभिव्यक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 19:44 IST

सौंदर्य हे मानवी लोकजीवनाचे, साहित्य, कला, संस्कृती आणि अध्यात्माचेही एक श्रेष्ठ मूल्य आहे.

- डॉ. रामचंद्र देखणे -  सौंदर्य हे मानवी लोकजीवनाचे, साहित्य, कला, संस्कृती आणि अध्यात्माचेही एक श्रेष्ठ मूल्य आहे. हे सौंदर्य दिसणारे नाही असणारे आहे. फक्त दिसण्यासाठी जे सौंदर्य असते ते ‘प्रदर्शन’ असते पण असण्यासाठी मात्र जे असते ते दर्शन होय. भाषा, विचार, कला ही सुंदरतेने जेव्हा नटते तेव्हा तीच माधुर्याने अभिव्यक्ती होते आणि अनुभवताही येते. ज्ञानदेवांनी गीतातत्वाच्या आणि गीताकथेच्या सौंदर्याविषयी म्हटले आहे,‘‘माधुर्यी मुधरता। शृंगारी सुरेखता। रुढपणा उचिता। दिसे भले।।’’ माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखता आणि रुढपणाला योग्यता प्राप्त होणे ही खरी सुंदरता आहे. सौंदर्याचे तत्वज्ञान घडविणारा तत्ववेत्ता म्हणून रवींद्रनाथांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. रवींद्रनाथ आणि म. गांधींचा एक संवाद फार महत्वाचा आहे. रवींद्रनाथांच्या आश्रमात एकदा गांधीजी गेले होते. पहाटे दोघेही फिरायला निघाले. चालताना रवींद्रनाथ म्हणाले, ‘‘मी पहाटे लवकर उठतो कशासाठी? मी पक्षांची गाणी ऐकतो. असणाºया झाडांचे नृत्य पाहतो. हळूच डोकावणाºया सूर्याची किरणे मला मोहीत करतात. मला या सर्वांतून जिकडे तिकडे सौंदर्य दिसते. त्यावर गांधीजी म्हणाले, ‘‘तुम्ही जेव्हा पहाटे निसर्गाचे सौंदर्य पाहता तेव्हा मला पहाटे उडणाऱ्या चिमण्या दिसतात. पंख फडकवून भरारी मारणारे पक्षी दिसतात. त्या चिमण्यांच्या, त्या पक्षांच्या मुखात चार दाणे कसे पडतील? याची चिंता मला भेडसावते. सकाळच्या उजेडात प्रकाशाने चमकणारी माणसे मला दिसतात. पण त्यांची आजची भूक कशी भागणार? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. हे सौंदर्यच मला अंतर्मुख करते. दोघेही सृष्टीचे उपासक, एकाची दृष्टी सौंदर्यवादी तर दुसºयाची वास्तववादी. दोघांची हृदये करूणेने भारलेली. निसर्ग सौंदर्याच्या अनुभूतीची आस असणारी. दोघेही एका अर्थाने करूणेचीच गीते गातात. एकाच्या गाण्याला सौंदर्याचा ध्यास तर दुसऱ्याच्या गीताला वास्तवाची आस. सौंदर्य देखील अधिक समृद्ध होते ते वास्तवाने. वास्तवाने उभे राहिलेले सौंदर्य आणि सौंदर्याच्या अभिव्यक्तीतून प्रगटलेले वास्तव हे मानवी जीवनाला माधुर्यही देते आणि खरा रुढपणाही बहाल करते आणि मग ज्ञानदेवांनी भाषेला, विचारांना दिलेला रुढपणा. माधुर्याच्या अनुभूतीने ‘उचिता’ म्हणजे भलेपणाला प्राप्त होतो.

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतAdhyatmikआध्यात्मिक