शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik; घरचे कुलदैवत हे आईसारखे असते...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 14:48 IST

घरचे कुलदैवत हे आईसारखे असते, त्याला सोडून लोक भलत्याचीच आराधना करतात. त्यामुळे कुलदेवाचा कोप होतो. कुणी कोणत्या देवाची आराधना ...

ठळक मुद्देकुलदेवतेच्या आराधनेशिवाय केलेल्या इतर देवदेवतांचे पूजन लाभत नाहीकुलदेवाला विसरलात तर कुटुंबाचा उद्धार कधीही होणार नाहीमाणसानाच देव मानून त्यांचा उदोउदो करणे हे योग्य नाही

घरचे कुलदैवत हे आईसारखे असते, त्याला सोडून लोक भलत्याचीच आराधना करतात. त्यामुळे कुलदेवाचा कोप होतो. कुणी कोणत्या देवाची आराधना करावी हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. त्याच्या श्रद्धा व भक्तीनुसार त्याचे कमी जास्त फळ मिळतेच, पण माणसानाच देव मानून त्यांचा उदोउदो करणे हे योग्य नाही.

कुलदेवतेच्या आराधनेशिवाय केलेल्या इतर देवदेवतांचे पूजन लाभत नाही. कुलदेवाला विसरलात तर कुटुंबाचा उद्धार कधीही होणार नाही. काही कुलदैवत सौम्य तर काही उग्र असतात पण त्यांना डावलून जर इतर पूजाअर्चा, साधूसंतांची आराधना केली तर कुलदेवतेचा कृपाशीर्वाद नसल्याने इतर आराधना म्हणावे तसे यश देऊ शकत नाहीत. ज्यांना कुलदैवत माहित नाही, त्यांनी काय करायचे असा प्रश्न पडतो. गावोगाव फिरत जाणाºया काही लोकांच्याकडून कुलदेव समजते असे म्हणतात पण ते लोक स्वत: अशिक्षित असतात. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न पडतो. त्यालाही उपाय आहेत.

ज्याना आपले कुलदैवत माहित नाही त्यानी कोठेही कुलदैवत शोधण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी काही पर्याय आहेत. त्यानुसार आराधना केल्यास कुलदेवाची कृपा निश्चित लाभू शकते. तुम्ही कितीही श्रीमंत, बुद्धिमान, हुशार असाल, सुखसमृद्धीचे मालक असाल पण कुलदेवाला कधीही विसरु नका अथवा कुलदैवत सोडून इतर आराधनाही  करू नका. कुलदेवतेची नित्य नियमित आराधना, पूजाअर्चा, कुलाचार व्यवस्थित चालू असतील तर कोणत्याही संकटातून आपले रक्षण होते किंवा त्यावेळी कोणती आराधना करावी याची सूचना कुलदैवताकडून नकळत मिळत जाते व संकटातून मार्गही सुचत जातो.

कोणत्याही तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात गेल्यावर कुलदेवाचे स्मरण करण्यास विसरु नका. अन्यथा तीर्थक्षेत्रीय देवतांचा कृपाशीर्वाद मिळत नाही. काही साधू संत अथवा धार्मिक संस्था तर कुलदेवाची आराधना सुद्धा करण्याची गरज नाही, असे तत्वज्ञान शिकवितात. कृष्णाची आराधना करणाºया बहुतेकांना गीतेत भगवान श्रीकृष्णाने काय तत्व सांगितलेले आहे, हेच माहीत नसते. आम्ही कृष्णाच्या नावाने गंध लावतो, त्याची पूजा करतो, त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचतो पण गीतेत काय सांगितले आहे, गीतेचा मतितार्थ काय आहे हे आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त कृष्णाची भक्ती करण्यास शिकवितात. पण मोठमोठे साधू, संत गीतेचे महत्त्व काय ते शिकवीत नाहीत, असे अनेकजण प्रांजलपणे कबूल करतात. गीतेतील एकेक अध्याय रोज वाचला तरी त्याच्यावर भगवंताची निस्सीम कृपा होते़ प.पू. श्री गुरूनाथ कंटीकर महाराज,शेळगी, सोलापूर..

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक