शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2019 Muhurta (Time) : जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त...!

By appasaheb.patil | Updated: August 31, 2019 19:15 IST

Ganesh Chaturthi Muhurta (Time) : गणपती बप्पा मोरया; सार्वजनिक मंडळांना मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही

आप्पासाहेब पाटील

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पांच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच, मात्र गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुध्द पध्दतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. याशिवाय गणपतीची कधी व कशी प्रतिष्ठापना करायची याबाबत कल्पना नसते़ त्यामुळे सोलापुरातील प्रसिध्द पंचागकर्ते मोहन दाते यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न - कधी करावी गणेशाची स्थापना व पूजन ?उत्तर - मागच्यावर्षी विसर्जनाच्या वेळेस आपण केलेल्या पुढच्या वर्षी लवकर या.. या प्रार्थनेनुसार गणपती बाप्पा ११ दिवस लवकर आला आहे़ सोमवार २ सप्टेंबर २०१९ रोजी सोमवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी सोमवारी ब्राह्ममुहूतार्पासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनी घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.

प्रश्न - गौरी आवाहनाबाबत काय सांगाल ?उत्तर - गुरूवार ५ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावयाचे असल्याने ५ सप्टेंबर रोजी गुरुवारी वैधृती योग असला तरी दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येईल़ ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन असल्याने शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने शनिवार ७ सप्टेंबर गौरी विसर्जन दिवसभरात केंव्हाही करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा असते मात्र यावर्षी तसे नाही दिवसभरात कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.प्रश्न - गणपती विसर्जनाबाबत मुर्हुत कोणता ? उत्तर - यावर्षी गुरूवार १२ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. १० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन यादिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी २२ आॅगस्ट २०२० रोजी गणेश चतुर्थी आहे.  -------------मध्यानंतर देखील करू शकता प्रतिष्ठापनासार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे़ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपती प्रतिष्ठापनेसाठी कुठल्याही मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मध्यानंतर देखील करता येऊ शकते.-------------चांगल्या कार्याची सुरूवात गणेश वंदनानेच होते...मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे.  भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला(गणेश चतुर्थी) घरी गणपतीची मूर्ती आणून, पूजा करून, गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अथवा अनंत चतुर्दशीपर्यत, पूर्ण दहा दिवस गणपती घरी बसवतात. गणेशोत्सव काळात भक्तीमय वातावरण असते़

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव