गिरीजात्मज गणपतीच्या मुखदर्शनाने भाविक सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:27+5:302021-09-25T04:11:27+5:30

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्री गिरीजात्मजास अभिषेक व महापूजा करण्यात आली. ...

Girijatmaj Ganapati's face comforted the devotees | गिरीजात्मज गणपतीच्या मुखदर्शनाने भाविक सुखावले

गिरीजात्मज गणपतीच्या मुखदर्शनाने भाविक सुखावले

Next

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्री गिरीजात्मजास अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार काशीनाथ लोखंडे उपस्थित होते. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी चतुर्थीनिमित्त श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले. कोरोनामुळे व लॉकडाउन निर्बंध चालू असल्याने मंदिरे बंद आहे; परंतु भारतीत पुरात्त्व विभागाने पर्यटकांकरिता १८ सप्टेंबरपासून लेण्या खुल्या केल्याने येणाऱ्या भाविकांना गणेश लेणीबाहेरुन श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शन होत आहे. सर्वांत मोठे सभामंडप व ओवऱ्या असलेल्या गणेशलेणीमध्ये गिरीजात्मजाची मूर्ती आहे; परंतु गणेश लेणी गणेश भक्तांसाठी बंद ठेवली आहे. परिणामी दिवसभरात अहमदनगर, नाशिक, ठाणे व इतर ठिकाणांवरून अनेक गणेश भक्तांनी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येऊन श्रींचे मुखदर्शन घेतले, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

Web Title: Girijatmaj Ganapati's face comforted the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.