राज्य राखीव पोलिस दलाची व्हॅन उलटून २० जवान जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:29 IST2018-10-20T14:27:03+5:302018-10-20T14:29:55+5:30
पुसद येथील दुर्गा देवीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी जात असलेली राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन उलटून झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले आहेत.

राज्य राखीव पोलिस दलाची व्हॅन उलटून २० जवान जखमी
ठळक मुद्देपुसद येथे बंदोबस्तासाठी जात असताना घडला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: पुसद येथील दुर्गा देवीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी जात असलेली राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन उलटून झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले आहेत. हा अपघात पुसद-हिंगोली मार्गावर शनिवारी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान झाला. हिंगोलीकडून पुसदकडे निघालेली ही गाडी खांडवा-मांडवा या घाटातून जात असताना अनियंत्रित होऊन उलटली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. जखमी जवानांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.