अवनी वाघिणीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:46 IST2018-11-20T12:45:57+5:302018-11-20T12:46:49+5:30
अवनी वाघिणीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील आंजी शिवारात सोमवारी दुपारी उघडकीस आली.

अवनी वाघिणीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार
ठळक मुद्देबछडे सुरक्षित असल्याचा निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवनी वाघिणीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील आंजी शिवारात सोमवारी दुपारी उघडकीस आली. तेजनी-आंजी शिवारातील सेक्टर ६५३ मध्ये ही घटना घडली.
अवणी वाघिणीच्या मृत्युनंतर वनविभागाने तिच्या बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून आंजी शिवारातील जंगलात घोडा बांधून ठेवला होता. त्याची शिकार झाल्याचे सोमवारी दुपारी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. वन विभागाने या घटनेला दुजोरा दिला. त्यामुळे वाघिणीची दोन बछडे शिकार करू लागल्याचे सिद्ध झाले. परिणामी त्यांच्या उपासमारीचा प्रश्न मिटल्याचे मानले जाते.