यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:00 IST2018-11-03T11:59:48+5:302018-11-03T12:00:09+5:30

पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला.

Farmers' roadblock in Khandala, Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे मुंबई पुणे वरून पुसदमार्गे यवतमाळ येणारी व जाणारी वाहतूक जवळपास २ तास खोळंबली. पुसद तालुका विद्युत पुरवठा सुरळीत करणे, पिकांची आणेवारी घोषित करून पीक विमा देणे, माळपठारावरील सर्व शिक्षण करणाºया मुला मुलींचे शाळेचे शुल्क माफ करणे, तलावाचे काम त्वरित चालू करणे, पैंनगंगा नदीवर गेट बसवण्यात यावे या सर्व मागणीसाठी माळपठारवरील ११७ गावातील लोकांनी चक्का जाम करण्यात आला. यासाठी माळमठर समितीचे मार्गदर्शक सदाशिव नाईक, अध्यक्ष बी .जी .राठोड, उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, शिवसेनेचे उपसभापती गणेश पण्गिरे, विकास जामकर, माजी तालुका प्रमुख शिवसेना बाबूशिंग आडे, जी .प .सदस्य विवेक मस्के, उल्हास राठोड, गजानन उघडे, वसंता चीरमारे, रवींद्र महल्ले व सर्व शेतकरी गावकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers' roadblock in Khandala, Yavatmal district