माणिकडोह येथे बंजारा लेंगी स्पर्धा

By Admin | Updated: March 12, 2017 00:59 IST2017-03-12T00:59:52+5:302017-03-12T00:59:52+5:30

संत सेवालाल जयंती उत्सव समिती व मोतीराम चव्हाण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने माणिकडोह येथे बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत.

The competition will take place at Manikdoh | माणिकडोह येथे बंजारा लेंगी स्पर्धा

माणिकडोह येथे बंजारा लेंगी स्पर्धा

पुसद : संत सेवालाल जयंती उत्सव समिती व मोतीराम चव्हाण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने माणिकडोह येथे बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत. उद्घाटन इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झाले. प्रथम बक्षीस हासकी माता महिला लेंगी मंडळ बोरी ई. यांनी पटकाविले.
प्रमुख पहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीराम पवार, गजानन उघडे, भोलानाथ कांबळे, धनराज नाईक, सखाराम नाईक, पंडित नायक, कारभारी वसराम चव्हाण, रमेश राठोड, बाबुसिंग महाराज उपस्थित होते.
द्वितीय लोभिवंत महाराज पुरुष लेंगी मंडळ मोरवाडी, तृतीय जय सेवालाल पुरुष लेंगी मंडळ चिचपाड, चतुर्थ सामकी माता महिला लेंगी मंडळ माणिकडोह व पाचवे बक्षीस वाडी महिला लेंगी मंडळ बोरनगर यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून वसंता राठोड, माणिक महाराज, शैलेश आडे यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, संदीप चव्हाण, प्रा.रमेश जाधव, सरपंच बंडू नाईक, प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत झाले. यशस्वीतेसाठी किसन राठोड, विष्णू राठोड, जयसिंग राठोड, विलास चव्हाण, गजानन राठोड, पी.एन. टेलर, विष्णू चव्हाण, आत्माराम चव्हाण, लक्ष्मण महाराज, साहेबराव चव्हाण, श्रीकांत चव्हाण, दिनेश चव्हाण, शेषराव जाधव, विकास चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The competition will take place at Manikdoh