खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:36 AM2020-08-12T08:36:53+5:302020-08-12T10:24:05+5:30

New Debut In WWE, The Retributions Entry In WWE, WWE Smackdown: द रेट्रीब्यूशन ने WWE  मध्ये खळबळजणक पद्धती एन्ट्री केली आहे. एन्ट्री करताच रिंगमध्ये नुकसान करण्यास सुरुवात केली.

Dangerous Video! New Debut of The Retributions Entry In WWE | खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

googlenewsNext

WWE मध्ये नवीन सुपरस्टारच्या एन्ट्रीने खळबळ उडाली आहे. या आठवड्यात स्मॅकडाऊन (SmackDown) च्या मुख्य इव्हेंटमध्ये प्रेक्षकांना एका नवीन फॅक्शन द रेट्रीब्यूशनचा डेब्यू पहायला मिळाला आहे. या टीमने आल्याआल्याच रिंगमध्ये खळबळ उडवून दिली. याची दहशत एवढी होती की कॉमेंटेटर आपल्या खुर्च्या सोडून पळाले. यानंतर कॅमेरामनही तेथून गायब झाले. 


स्मॅकडाऊन (SmackDown) मुख्य इव्हेंटमध्ये द हेव्ही मशिनरी vs द मिज अँड जॉन मॉरिसन यांच्यात हाणामारी सुरु होती. याचवेळी मेंडी सोजने रिंगमध्ये येऊन सोन्या डेव्हिलवर हल्ला केला. अनेक प्रयत्नांनंतरही त्यांच्यातील लढाई संपण्याचे नाव घेत नव्हती. तेव्हाच अंधार पसरला आणि सर्व लाईट बंद झाली. 



यानंतर लाईट सुरु होताच जे झाले ते पाहून सारेच हैरान झाले. द रेट्रीब्यूशनच्या लोकांनी मध्येच एन्ट्री मारली आणि खतरनाक पद्धतीने रिंगमध्येच हैदोस घालण्यास सुरुवात केली. त्यांनी रिंगचे दोर कापून टाकले आणि तोडफोड करायला सुरुवात केली. 



नवीन फॅक्शन द रेट्रीब्युशनमध्ये एकूण 5 रेसलर्स आहेत. यामध्ये 3 पुरुष आणि 2 महिला सुपरस्टार आहेत. त्यांनी काळा मास्क आणि पूर्ण शरीर काळ्या कपड्यांनी झाकलेले होते. त्यांनी कॉमेंटेटरचेही टेबल तोडून टाकले. त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. 



सुरुवातीलाच एवढा उत्पात माजविल्याने त्यांची जरब जुन्या रेसलर्सवर बसणार की नाही हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. एनएक्सटी ही अशी टीम आहे जी आतापर्यंतची सर्वात घातकी आहे. 


अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Web Title: Dangerous Video! New Debut of The Retributions Entry In WWE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.