Next

नाशिकमध्ये गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 10:08 PM2017-08-18T22:08:41+5:302017-08-18T22:09:21+5:30

नाशिक : किर्ती कलामंदिर संस्थेतर्फे २४ व्या पंडीत गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला शुक्रवारी (दि. १८) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या ...

नाशिक : किर्ती कलामंदिर संस्थेतर्फे २४ व्या पंडीत गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला शुक्रवारी (दि. १८) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाचे पाहिले पुष्प आदिती नाडगौडा - पानसे यांनी 'दि रिदमीक पॉईंज' या संकल्पनेवर आधारित कथक नृत्याने गुंफले. संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमला रसिकांनी विशेष दाद दिली.