Next

Utpal Parrikar माघार घेणार? Amit Shah रविवारी गोव्यात...काय होणार? Goa Election 2022 BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:54 PM2022-01-25T15:54:56+5:302022-01-25T15:55:18+5:30

Goa Election 2022 News Today : मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर काही केल्या मागे हटायला तयार नाहीत. पणजीतून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं पण भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही. उत्पल नाराज झाले, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. पणजीतून लढण्यावर उत्पल ठाम आहेत. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांकडून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न सुरु आहे. आता उत्पल यांचं बंड शमत नसतानाच अमित शहांची गोव्यात एंट्री होणार आहे. रविवारी अमित शहा गोव्यात येणार आहेत. आता अमित शहांच्या एंट्रीमुळे गोवा भाजपसमोरची डोकेदुखी कमी होणार का, उत्पल पर्रीकर माघार घेणार का, पणजीतून भाजप आपला उमेदवार बदलणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात अमित शहा अचानक गोव्याला का जाणार आहेत ते...