Next

नितेश राणेंवर अमित शहांचा तो फोटो डिलीट करण्याची वेळ का आली? Amit Shah Arrest Photo | Nitesh Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:11 PM2022-02-04T16:11:29+5:302022-02-04T16:11:47+5:30

नितेश राणे यांनी ट्विट करुन जो फोटो शेअर केलाय.. त्याकडे नीट पाहा.. एका बाजूला अमित शहा अटकेत दिसतायत.. तर दुसऱ्या बाजूला पी चिदंबरम... २००९ मध्ये पी चिंदबरम हे गृहमंत्री असताना अमित शहांना अटक झाली होती.. तर दहा वर्षांनी अमित शहा गृहमंत्री असताना चिदंबरम यांना अटक झाली होती.... या दोन घटनांवर राणे यांनी लिहिलं होतं.. की "समय बडा बलवान होता है, इन्सान खाम खा गुरुर करता है" ... आता हे सगळं राणेंनी त्यांच्या अटकेच्यानंतर केलं.. त्यामुळे यातून थेट शिवसेना आणि महाविकास आघाडीला त्यांना इशारा द्यायचा होता.. हे उघड आहे... सुरुवातीला राणेंनी दाखवलेल्या या बाण्याचं कौतुक झालं... राणे या अटकेचा बदला घेणार, असाच याचा अर्थ निघत होता.. पण झालं भलतंच.. या ट्वीटची चर्चा होते न होते. तोच काही तासांतच नितेश यांच्यावर अमित शहांचा फोटो वापरून केलेलं हे ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली...