Next

कोरोनात या नर्सला 'व्हायग्रा'च्या गोळीने कसं वाचवलं? What Is Viagra Tablet | Use of Viagra | Corona

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:32 PM2022-01-05T17:32:54+5:302022-01-05T17:33:15+5:30

आता आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत, ते ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... एक ३७ वर्षीय महिला... कोरोनाच्या जाळ्यात अडकली... तब्बल ४५ दिवस ती कोमात होती... तिचं व्हेंटिलेटर सपोर्ट पुढच्या ७२ तासांत काढून घेतलं जाणार होतं... आणि तोच तिच्या एका सहकाऱ्याला एका गोळीची कल्पना सुचली.. मोनिका अल्मेडा नावाच्या या नर्सवर अखेर या गोळीचा प्रयोग केला गेला... आणि चमत्कार झाला... मोनिका अल्मेडा तब्बल ४५ दिवसांनी कोमातून बाहेर आली.... या प्रयोगानंतर तिला जी गोळी देण्यात आली, त्या गोळीची चर्चा जगभरातील सोशल मीडियावर सुरु झालेय... कारण ही गोळी आहे वायग्राची... लैंगिक क्षमता किंवा ताकद वाढवण्याची गोळी म्हणून वायग्राची गोळी प्रसिद्ध आहे... त्यामुळे या गोळींने ४५ दिवस कोमात गेलेली महिला उठली, हे ऐकून कुणाचाच यावर विश्वास बसेना... हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? याविषयी या व्हिडीओत सविस्तर बोलू.... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...