लोकसहभागातून जलसंधारणाची कामे;  साखरावासियांनी केली पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:35 PM2018-01-06T13:35:01+5:302018-01-06T13:37:34+5:30

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली.

Water conservation works; overcome the water shortage | लोकसहभागातून जलसंधारणाची कामे;  साखरावासियांनी केली पाणीटंचाईवर मात

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे;  साखरावासियांनी केली पाणीटंचाईवर मात

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही.  जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले.सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले.

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली. त्यामुळेच  येथील सिंचन क्षेत्र अडिचपटीने वाढत १०० हेक्टरवरून २५० हेक्टर झाले, तसेच अल्प पावसामुळे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही. 

 वाशिम जिल्ह्यातील मौजे साखरा ता.जि.वाशिम येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यांनी २८ नोव्हेंबर २०११ ला साखरा येथे ग्रामसभा घेऊन गावकºयांचे सहकार्य  व लोकसहभाग, श्रमदान करण्याची जिद्द पाहून या गावाची आदर्श गाव योजनेत निवड केली. साखरा ग्रामस्थ तथा कृ षी मित्र बहुद्देशीय संस्थ बोराळाचे  अध्यक्ष आर.आर.वानखेडे, सचिव नारायण महाले यांनी केलेल्या जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले. ज्या ठिकाणी नाल्याचा ओघळी उगम होतो. त्या ठिकाणचा गाळ व पाणी वाहून जाऊ नये म्हणून वरच्या भागामध्ये दोन नाल्यावर जाळीचे बंधारे करण्यात आले. जाळीचे बंधारे निर्मितीनंतर नाल्यांमध्ये रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली. सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले. यामुळे गावाच्या पाण्याची पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली. यामुळे गावातील सिंचना क्षमता १०० हेक्टर वरुन २५० हेक्टरवर आली आहे, हल्ली साखरा गावात, गहु, हरभा, कांदे, लसन, गोभी,  दोडका, फळबाग ही पिक शाश्वतरित्या घेतली जात आहेत. तसेच ओल्या चाºयामुळे  दुग्ध व्यवसायात वृध्दी झाली आहे. या जलसाक्षरतेमुुळे  रब्बी पिक वाढल्याने  मजुराचे स्थलांतरही थांबले आहे.

Web Title: Water conservation works; overcome the water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.