वाशिम : पीक कर्जमाफीसाठी ‘वेट अँण्ड वॉच’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:09 AM2017-12-09T02:09:32+5:302017-12-09T02:12:36+5:30

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते.

Washim: 'Wait and watch' for crop loan waiver! | वाशिम : पीक कर्जमाफीसाठी ‘वेट अँण्ड वॉच’! 

वाशिम : पीक कर्जमाफीसाठी ‘वेट अँण्ड वॉच’! 

Next
ठळक मुद्दे राष्ट्रीयीकृत बँकेचे ६ टक्के शेतकरी कर्जमुक्त एकूण ८३ टक्के लाभार्थींना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते. एकूण १ लाख ६४ हजार ५३४ पैकी २८ हजार ३३३ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ही टक्केवारी १७.२२ अशी येते. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख वाशिम जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने किमान मंत्र्यांनी तरी पात्र शेतकर्‍यांना कधीपर्यंत कर्जमाफी मिळेल यासंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहेत.
जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यामध्ये राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेचे ६३ हजार ५५८, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे २१  हजार ८४८ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १२८ शेतकर्‍यांचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, तांत्रिक अडचणीत ही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतरही या ना त्या कारणाने कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरूच राहिले. कर्जमाफीची घोषणा होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला; आतापर्यंत शासनस्तरावरून जिल्ह्याला राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून एकूण ३0 हजार ८८८ शेतकर्‍यांसाठी २५८ कोटी रुपये प्राप्त झाले. यापैकी २८ हजार ३३३ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात १३0 कोटी रुपये जमा झाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. 
राष्ट्रीयीकृत बँकेच्या ४२२९ पात्र शेतकरी लाभार्थींसाठी २३ कोटी २0 लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्यापैकी ३३२४ शेतकर्‍यांना १३.१९ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम कर्जखात्यात वळती करण्यात आली. ही टक्केवारी ५.३८ अशी येते. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या २0६९ शेतकरी लाभार्थींसाठी १३ कोटी ९४ लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २0६९ लाभार्थींच्या कर्जखात्यात १३ कोटी ९४ लाख रुपये वळते करण्यात आले.  ही टक्केवारी ९.४0 अशी येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७९ हजार १२८ शेतकर्‍यांपैकी २४ हजार ५९0 शेतकर्‍यांसाठी शासनाकडून २२0 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २२ हजार ८४0 शेतकर्‍यांना १0२ कोटी ९४ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला. 
राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून मिळून २५५५ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात येत्या दोन-तीन दिवसांत कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अद्याप जिल्ह्यातील एकूण १ लाख ३३ हजार ६४६ अर्थात ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून, कर्जमाफी केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख हे शनिवार, ९ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात आढावा बैठक घेणार आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी केव्हा मिळेल, याबाबत मंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.

Web Title: Washim: 'Wait and watch' for crop loan waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी