वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:51 IST2018-02-08T19:26:22+5:302018-02-08T19:51:38+5:30
मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील दादाराव गवई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर मधुकर गाभणे यांच्या शेतातील विहिरीवर मुरूम आणण्यासाठी गेले होते. गवई यांचा मुलगा सचिन हा ट्रॅक्टर चालवत होता. दरम्यान, मुरूम भरत असतानाच अचानक तोल गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५० फूट खोल विहिरीमध्ये पडले. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. तासभरानंतर त्याचे पार्थिव विहिरीतून बाहेर काढण्यातआले. तसेच ८ फेब्रुवारीला सकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आली.