वाशिम : महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:28 PM2017-12-14T23:28:13+5:302017-12-14T23:29:21+5:30

वाशिम : माऊंट कारमेल स्कुलमधील स्वयंपाक बनविणा-या महिलेची हत्या करणा-या आरोपीला विद्यमान न्यायालयात हजर केले असता, १४ डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.

Washim: Police custody till December 18 in connection with the murder of the woman | वाशिम : महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वाशिम : महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देमाऊंट कारमेल स्कुलमधील घटना वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहे तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : माऊंट कारमेल स्कुलमधील स्वयंपाक बनविणा-या महिलेची हत्या करणा-या आरोपीला विद्यमान न्यायालयात हजर केले असता, १४ डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.
सुरकंडी (ता.जि. वाशिम) येथील माऊंट कारमेल इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक तथा फादर संजय वानखडे यांच्या निवासस्थानी स्वयंपाक बनविण्यासाठी वनमाला भिमराव कांबळे (रा. काकडदाती ता.जि. वाशिम) हि महिला गेल्या एक वर्षापासून कामाला होती. तिच्याकडे स्वयंपाक गृहाची जबाबदारी देण्यात आली होती. याच शाळेतील चौकिदार अण्णाजी तुकाराम सरदार व त्यांचा मुलगा गुणाजी सरदार हे दोघे फादर वानखडे यांच्या ‘अपरोक्ष’ निवासस्थानातील खाण्यापिण्याच्या वस्तु व इतर साहित्याचा वापर करीत होते. वनमाला कांबळे ही अण्णाजी व त्यांचा मुलगा गुणाजी यांना वारंवार खाण्यापिण्याची वस्तू व ईतर सामान वापरण्यासाठी मनाई करायची. हा राग मनात धरून चौकिदार अण्णाजी सरदार याने १३ डिसेंबर रोजी डोक्यात कुºहाड मारून वनमाला हिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. १४ डिसेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने दिले. पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: Washim: Police custody till December 18 in connection with the murder of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.