वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:10 PM2018-01-15T16:10:17+5:302018-01-15T16:13:03+5:30

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली.

Washim: Messages of cleanliness given on the accession of Makar Sankranti | वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

Next
ठळक मुद्देमकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गावभरात सफाई अभियान राबविले; स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. यामध्ये गावातील युवक मंडळीसह न्यायपालिकेतील मानद न्यायदंडाधिकारी, शिक्षक आणि इतर अधिकाºयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

मकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण असताना आणि या दिवशी सूर्याचे दक्षिणायन होत असल्याने हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. गावकºयांनी मकर संक्रांतीच्या औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मोरे, रजेवर आलेले भारतीय सैनिक शंकर वैरागडे, अनिल कढणे, राष्ट्रपाल जाधव, अ‍ॅड. सिद्धार्थ जाधव, वरिष्ठ लिपिक नामदेव वानखडे, लिपिक पांडुरंग गोटे, धनराज गोटे, निलेश वायचाळ, शिक्षक गोपाल तापडिया, मनोज गोटे, विकास मोरे, संतोष वायचाळ, संतोष कढणे, विकास वायचाळ, विनायक वायचाळ, कैलास वायचाळ, राजकुमार वायचाळ, पोलीस कर्मचारी दिलिप जाधव, शाळा सुधार समिती अध्यक्ष शामराव वायचाळ, तंटामूक्ती अध्यक्ष भारत खंडारे, पोलीस पाटील विजय जाधव, उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वायचाळ, गजानन कढणे, सुभाष मोरे, संजय मोरे, गणेश वायचाळ, किशोर वायचाळ आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.


दंवडी देऊन   आवाहन

राजगावचे सरपंच अरविंद अहिरे पाटील यांच्या नेतृत्वात गावात स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश देण्यासाठी चक्क्क दंवडी देण्यात आली. या दंवडीद्वारे गावकºयांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि राजगावातील मूळ रहिवासी पंढरी गोटे यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापक मंडळींनी यात सहभाग घेतला. 

Web Title: Washim: Messages of cleanliness given on the accession of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.