वाशिम जिल्हा :  आसोला आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव; रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:21 PM2017-12-04T15:21:02+5:302017-12-04T15:22:38+5:30

आसोला खु. : येथे लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर उपचार होत नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागण्याची वेळ आली आहे. येथे आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Washim District: Lack of facilities in Asola health sub-center | वाशिम जिल्हा :  आसोला आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव; रुग्णांची गैरसोय

वाशिम जिल्हा :  आसोला आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव; रुग्णांची गैरसोय

Next
ठळक मुद्देआरोग्य सेविकेची नियुक्ती करा ग्रामस्थांची मागणी

आसोला खु. : येथे लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर उपचार होत नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागण्याची वेळ आली आहे. येथे आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गोर गरिब जनतेवर उपचार व्हावे व त्यांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात यासाठी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले मात्र येथे नियुक्त असलेल्या आरोग्य सेविका या प्रसृती रजेवर गेल्या आहेत. त्या जागी कंत्राटी आरोग्य सेविकेची निवड करण्यात आली होती परंतु कंत्राटी सेविका दोन महिन्यापासून गावातच आली नसल्याचे ग्रामस्थ सांगताहेत. यामुळे रुग्णांना या उपकेंद्राचा काहीच फायदा होत नसल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य सेविका येत नसल्याने अनेकदा दवाखानाच उघडण्यात आले नसल्याचे दिसून आले. तसेच आरोग्य उपकेंद्रात परिसरात स्वच्छता केल्या जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य सुध्दा दिसून येत आहे. आरोग्य उपकेंद्रातून उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांकडे धाव घेवून पैसे मोजावे लागत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून या सर्व प्रकाराची चौकशी करुन ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Washim District: Lack of facilities in Asola health sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.