वाशिमच्या सायकलस्वारांनी तीन दिवसांत गाठली मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 12:31 PM2018-09-24T12:31:49+5:302018-09-24T12:32:51+5:30

वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली.

Washim cyclists arrive in Mumbai three days | वाशिमच्या सायकलस्वारांनी तीन दिवसांत गाठली मुंबई

वाशिमच्या सायकलस्वारांनी तीन दिवसांत गाठली मुंबई

Next
ठळक मुद्देया मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते.  वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली. या मोहिमेचे हे सलग तिसरे वर्ष होते.  ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्ती आणि रक्तदान आणी सायकलची नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नारायण व्यास, महेश धोंगडे व अक्षय हजारे हे तीन युवक सहभागी झाले होते. 
ग्लोबल वार्मिंगची समस्या, प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान श्रेष्ठ दान, सायकलचा वापर हा संदेश घेऊन  नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश धोंगडे या तीन युवकांनी वाशिम ते लालबाग (मुंबई) या प्रवासाला १६ सप्टेंबरपासुन सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली. सलग तीन वर्षांपासून हे युवक सायकलद्वारे वाशिम ते मुंबई सायकल मोहीमेचे आयोजन करत आहेत.  आपल्या सायकल प्रवासात प्रतीदिन २०० किमीचा प्रवास या युवकांनी करुन दुसºया दिवशी चाकण येथे मुक्काम करुन सकाळी पुन्हा मुंबईसाठी कुच केले. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी मुंबईत पाऊल ठेवत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आपल्या सायकल प्रवासात या युवकांनी ठिकठिकाणी रक्तदान, ग्लोबल वार्मिग, प्रदुषणमुक्ती, सायकल वापरा या विषयावर जनजागृती करत रक्तदान करा, सायकलचा जास्तीत जास्त वापर करा असा संदेश दिला.

Web Title: Washim cyclists arrive in Mumbai three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.