हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर

By admin | Published: June 16, 2014 12:21 AM2014-06-16T00:21:35+5:302014-06-16T00:43:33+5:30

हॉटेल्स्, ढाब्यांच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडरधारकांची संख्या नगण्य आहे.

Use of domestic cylinders in hotel | हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर

हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर

Next

जउळकारेल्वे : जऊळकारेल्वे पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या प्रमुख गावांच्या बसस्थानकावरील हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडर गॅसचा सर्रास वापर होत आहे. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर जऊळका रेल्वे परिसरातील हॉटेल्स्, ढाबे येथे सर्रास वापरले जात आहे. हॉटेल्स्, ढाब्यांच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडरधारकांची संख्या नगण्य आहे.

या तफावतीच्या आकड्यावरून व्यावसायिक क्षेत्रात घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरची किंमत ४५0 रुपयाच्या आसपास तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६00 रुपयाच्या आसपास आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत जास्त असल्याने हॉटेल्सवाले घरगुती सिलिंडरकडे वळतात आणि येथूनच सिलिंडरच्या काळ्याबाजाराला सुरूवात होते. मालेगाव शहरासह जऊळकारेल्वे परिसरातील व्यावसायिक क्षेत्रात घरगुती गॅसचा वापर सर्रास सुरू होता. दीड वर्षापूर्वी मालेगावचे तत्कालिन तहसीलदार मदन राठोड यांनी तालुक्यात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यामध्ये डव्हा फाटा येथील एका हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडर आढळून आल्याने कारवाई केली होती. त्यानंतर कारवाईची मोहिम अधूनमधून सुरू होते. गत सहा महिन्यांपासून तर कारवाईची मोहिम ठप्प पडली आहे. त्यामुळे हॉटेल व ढाब्यांवर घरगुती सिलिंडर गॅसचा वापर सर्रास केला जात आहे. याकडे तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Use of domestic cylinders in hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.