वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:18 PM2018-10-09T17:18:44+5:302018-10-09T17:20:13+5:30

मानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. 

Two died in two different incidents in Washim district! | वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू!

वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. 
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील आमगव्हाण येथील ४५ वर्षीय इसम दिलीप दगडू अखतकर हे त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देत असताना त्यांना अचानक विजेचा जबर शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची फिर्याद बालाजी दगडू अखतकर यांनी पोलिसांत दाखल केली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसºया घटनेत शिरपूरजैन पोलिस स्टेशनच्या हद्दीत; पण रिसोड तालुक्यात येणाºया वाघी खुर्द येथील सुभाष रामभाऊ भोसले (वय ५२ वर्षे) यांनी दारू प्राशन केली असतानाच त्यावर विषारी औषधही प्राशन केले. ७ आॅक्टोबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सुभाष भोसले यांना उपचारासाठी गोवर्धना येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी शिरपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two died in two different incidents in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.