नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा; तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिन

By संतोष वानखडे | Published: February 21, 2024 08:15 PM2024-02-21T20:15:15+5:302024-02-21T20:25:03+5:30

जिल्हा परिषद सीईओंचा पुढाकार : कक्षही स्थापन.

Third Thursday Grievance Redressal Day | नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा; तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिन

नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा; तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिन

वाशिम : लोकाभिमुख व पारदर्शक कारभार आणखी गतिमान करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता दर महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले.

ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरीक येतात. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावर एखाद्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अनेकजण न्याय मिळेल या अपेक्षेतून जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. अनेकवेळा संबंधित अधिकारी एखाद्या मिटींगमध्ये किंवा दौऱ्यावर असल्याने संबंधित लाभार्थीला ताटकळत बसण्याशिवाय किंवा खाली हात घरी परत जाण्याशिवाय पर्याय नसतो. यामध्ये लोकांचा वेळ व पैसा खर्च होतो. ग्रामीण जनतेची ही गैरसोय दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पुढाकार घेतला असून, यापुढे दर महिन्यातील तिसऱ्या गुरूवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.
 
सर्वांशी चर्चा अन् गुरूवार निश्चित
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सीईओ वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांशी चर्चा करीत तक्रार निवारण दिन घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विभाग प्रमुखांकडून होकार मिळाल्याने तक्रार निवारण दिनासाठी दर महिन्यातील तिसरा गुरूवार निश्चित करण्यात आला.
 
तिसऱ्या गुरूवारी समस्यांवर उपाय
जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, तक्रारींवर चर्चा करणे आणि त्या सोडविण्यासाठी उपायययोजना करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व विभाग प्रमुख व तक्रारींशी संबंधित असलेले इतर कर्मचारी एकत्र बसून समोरासमोर त्या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: Third Thursday Grievance Redressal Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम