वाशिम बाजार समितीत सोयाबीन तेजीत; ३२०० रुपयापर्यंत पोहोचला दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:05 PM2018-01-09T14:05:46+5:302018-01-09T14:07:46+5:30

वाशिम : अत्यल्प, अल्प, मध्यम भूधारक शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपल्यानंतर आता सोयाबीनचे बाजारभाव तेजीत येत आहेत. वाशिम बाजार समितीत प्रती क्विंटल ३२०० रुपयांपर्यंत दर पोहोचला.

Soybean prices increase in Washim Market Committee | वाशिम बाजार समितीत सोयाबीन तेजीत; ३२०० रुपयापर्यंत पोहोचला दर !

वाशिम बाजार समितीत सोयाबीन तेजीत; ३२०० रुपयापर्यंत पोहोचला दर !

Next
ठळक मुद्दे गत १५ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात किंचितशी वाढ होत असल्याचे दिसून येते. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ३०५० रुपये असताना बाजार समित्यांमध्ये २३०० ते २८०० रुपये असा दर मिळाला होता. अल्प, मध्यम भूधारक शेतकºयांनी यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केल्याने आता आवक तेजीत नसल्याचे दिसून येते.

 

वाशिम : अत्यल्प, अल्प, मध्यम भूधारक शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपल्यानंतर आता सोयाबीनचे बाजारभाव तेजीत येत आहेत. वाशिम बाजार समितीत प्रती क्विंटल ३२०० रुपयांपर्यंत दर पोहोचला. येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

२०१७ मध्ये शेतकºयांना विविध संकटांचा सामना करावा लागला. सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. सुरूवातीला सोयाबीनला १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. अल्प, अत्यल्प व बहुतांश मध्यम भूधारक शेतकऱ्यां नी मातीमोल भावात सोयाबीन विक्री करून दैनंदिन आर्थिक व्यवहार व ऊसनवारीचे व्यवहार पूर्ण केले होते. मध्यंतरी सोयाबीनचे दर २३०० ते २८०० रुपयादरम्यान स्थिर राहिले. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ३०५० रुपये असताना बाजार समित्यांमध्ये २३०० ते २८०० रुपये असा दर मिळाला होता. नाफेड केंद्रावरील जाचक अटी, ऊधारीवर असलेली खरेदी यामुळे नाफेड केंद्रावरही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी फारशी गर्दी केली नव्हती. आता गत १५ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात किंचितशी वाढ होत असल्याचे दिसून येते. वाशिम बाजार समितीमध्ये तर ३२०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहचले. अर्थात ३२०० रुपये दर हा चांगल्या प्रतीचा सोयाबीनला मिळाला, असे व्यापाºयांनी स्पष्ट केले. सरासरी २७०० ते ३२०० रुपयादरम्यान सोयाबीनला प्रती क्विंटल दर असल्याचे दिसून आले. अल्प, मध्यम भूधारक शेतकºयांनी यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केल्याने आता आवक तेजीत नसल्याचे दिसून येते. मोठ्या शेतकºयांना या बाजारभावाचा फायदा होत असल्याचे दिसून येते. 

Web Title: Soybean prices increase in Washim Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम