पोटच्या मुलानेच आईची हत्या करुन मृतदेह जाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:33 PM2018-10-31T15:33:43+5:302018-10-31T15:34:18+5:30

मंगरुळपीर (वाशिम) : विळयाने वार करून जन्मदात्या आईला पोटच्या मुलानेच जीवंत जाळल्याची, मन हेलावून टाकणारी घटना मंगरूळपीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर (पंचशीलनगर) येथे ३१ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

son murdered his mother and burnt the dead body | पोटच्या मुलानेच आईची हत्या करुन मृतदेह जाळला !

पोटच्या मुलानेच आईची हत्या करुन मृतदेह जाळला !

Next

पत्नीलाही केले गंभीर जखमी : मंगरुळपीर शहरालगतची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : विळयाने वार करून जन्मदात्या आईला पोटच्या मुलानेच जीवंत जाळल्याची, मन हेलावून टाकणारी घटना मंगरूळपीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मूर्तिजापूर (पंचशीलनगर) येथे ३१ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने पत्नीसह वहिणीलादेखील जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी अतुल गावंडे याला जेरबंद केले असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. 
मंगरूळपीर शहराला लागूनच असलेल्या मूर्तिजापूर येथे अतुल गावंडे हा आई व पत्नीसह राहतो. ३१ आॅक्टोबरच्या पहाटेदरम्यान झोपेतच त्याने आईवर विळ्याने सपासप वार करून नंतर जीवंत पेटवून दिले. हा प्रकार लक्षात येताच पत्नीने सासूला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू तिच्यावरही विळ्याने वार केले. आवाजाने वहिणी जागी झाल्याने तिने मदतीसाठी आरडाओरड केली. वहिणीलादेखील मारहाण केल्याचा प्रकार घडला. आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घडलेला थरार पाहून सर्वच आवाक् झाले. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. आरोपी अतूल गावंडे हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. हा प्रकार नेमका कोणत्या कारणावरून घडला, या दृष्टिकोनातून मंगरूळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत. आरोपी हा मनोरूग्ण असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीवर मंगरूळपिरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Web Title: son murdered his mother and burnt the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.