ठळक मुद्देदुकानदारांची धावपळ प्लास्टिक कॅरीबँग्ज जप्ती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  प्लास्टिक पिशव्या (कॅरिबॅग्ज) वापरामुळे पर्यावरणावर होणारा  परिणाम लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १० नोव्हेंबरपासून प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. अचानक राबविण्यास सुरुवात केलेल्या या मोहीमेमुळे प्लास्टिक पिशव्या वापरणा-या दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली . सदर मोहीम राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी दुकानात जावून प्लास्टिक पिशव्या ठिकाणांची झाडझडती घेवून त्या जप्त करण्यात आल्यात. 
प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीव, मनुष्यावर परिणाम करतो. शहरामध्ये याचा वाढता वापर बघता ४० माईक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाइ्रची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ही मोहीम राबवून सर्व दुकानदारांना कल्पना देण्यात आली होती. ही मोहीम आता केव्हाही सुरु करुन प्लास्टिक कॅरीबॅग्ज वापरणºया दुकानदांरावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा दुकानदारांना देण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणार्थ कोणीही प्लास्टिक बॅग्ज न वापरण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आठवडी बाजाराच्या दिवशी मोठया प्रमाणात लघु व्यावसायिक दुकाने थाटतात . दर रविवारी विशेष मोहीमेसह दररोज गावातील दुकानदार, लघुव्यावसायिकांच्या जवळ जावून त्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो काय याची शहनिशा करणे व आढळल्यास त्याला ताकीद ेदण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करणार आहेत. आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व जनावरांसाठी प्लास्टिक पिशव्या घातक असल्याने त्याचा वापर टाळावा असे आवाहनही नगरपरिषद आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. या मोहीमेत स्वच्छता पर्यवेक्षक राजेश महाले, जितु बढेल, नागपूरकर, साईनाथ सुरोशे यांच्यासह नगरपरिषद कर्मचाºयांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे.  (प्रतिनिधी)

वाशिम नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यसात येत असलेल्या प्लास्टिक निर्मूलन मोहीमेला व्यापाºयांनी सहकार्य करावे तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करावे.                   
- गणेश शेटे, नगरपरिषद, मुख्याधिकारी वाशिम