वाशिम शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:27 PM2017-12-15T14:27:56+5:302017-12-15T14:29:15+5:30

वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते,.

School children in danger due to uncontrolled vehicles in Washim city! | वाशिम शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

वाशिम शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

Next
ठळक मुद्दे शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात.


वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते, अशी बिकट स्थिती उद्भवली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे चिक्कार गर्दीतून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागही अद्याप पुढे आलेला नाही. त्यामुळे शाळेतील कर्मचाºयांनाच ही भूमिका पार पाडावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहरातील श्री शिवाजी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एसएमसी इंग्लिश स्कुल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय रस्त्याच्या कडेला वसलेले असून या शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. दरम्यान, शाळा सुरू होताना विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात; परंतु शाळा सुटल्यानंतर एकाचवेळी कुणी सायकलने; तर कुणी पायदळ शाळेच्या बाहेर पडतो. अशावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी धावणाºया वाहनांना किमान काहीवेळ जागीच थांबविल्यास विद्यार्थी सुरक्षितरित्या रस्ता ओलांडून घरच्या रस्त्याला लागू शकतात. मात्र, ही व्यवस्था अद्याप शहरात उभी झालेली नाही. शहर वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक असून नगर पालिका आणि जिल्हा प्रशासनानेही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे. 

वाशिममधील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळांनी त्यांना जाणवणाºया अडचणीसंदर्भात वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करायला हवा. शाळा सुरू होताना आणि सुटताना संबंधित शाळांसमोर निश्चितपणे वाहतूक कर्मचाºयांच्या ‘ड्युटी’ लावण्यात येतील.
- ज्योती विल्हेकर,
शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम

Web Title: School children in danger due to uncontrolled vehicles in Washim city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम