शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य द्या - दक्षता समिती सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:01 PM2018-01-13T16:01:08+5:302018-01-13T16:02:10+5:30

वाशिम - रेशन दुकानदारांकडून आधारकार्डाच्या प्रतींचे गहाळ होणे किंवा आधार लिंक करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी पाहता रेशनकार्ड आधारसोबत लिंक होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे रेशन धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक होईपर्यत ग्राहकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य वाटप करण्याची मागणी दक्षता समिती सदस्यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Provide food to the ration card holders according to the systematic method - Vigilance committee members' demands | शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य द्या - दक्षता समिती सदस्यांची मागणी

शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य द्या - दक्षता समिती सदस्यांची मागणी

Next
ठळक मुद्देपुरवठा विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - रेशन दुकानदारांकडून आधारकार्डाच्या प्रतींचे गहाळ होणे किंवा आधार लिंक करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी पाहता रेशनकार्ड आधारसोबत लिंक होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे रेशन धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक होईपर्यत ग्राहकांना प्रचलीत पध्दतीनुसार धान्य वाटप करण्याची मागणी दक्षता समिती सदस्यांनी केली. यासंदर्भात   जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
    निवेदनाचा आशय असा की, वाशीम शहर व ग्रामीण तसेच जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०१८ पर्यत शिधापत्रिका धारकांचे आधार क्रमांक लिंक करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पुरवठा विभागामार्फत यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. परंतु अनेक शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदारांना आधार क्रमांकाची झेरॉक्स प्रत वारंवार दिली असतांना दुकानदारांकडून या प्रती गहाळ केल्या जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरत आहे. तसेच आधार लिंक करण्याच्या मशीनमध्ये वारंवार बिघाड व अडचणी येत असल्यामुळे रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये रेशन देण्यावरुन वादावादी होत आहेत. त्यामुळे शासनाने विहीत मुदतीत आधार लिंक करण्याच्या तारखेपर्यत शिधापत्रिका धारकांना प्रचलीत पध्दतीनुसार रेशनचे धान्य देण्यात यावे. जेणेकरुन रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादी होणार नाही. याबाबीची आपण दखल घेवून यासंदर्भातील आदेश रेशन दुकानदारांना द्यावेत अशी मागणी दक्षता समिती सदस्यांनी दिलेल्या निवेदनातुन केली. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देतांना वाशीम शहर दक्षता समिती सदस्य तथा भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, दक्षता समिती सदस्य संजय इरतकर, सतिश बकाले, सुनिल तापडीया, संतोष तोंडे यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, शहर उपाध्यक्ष निलेश जैस्वाल, शहर उपाध्यक्ष कपिल सारडा, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवन जोगदंड यांची उपस्थिती होती.

Web Title: Provide food to the ration card holders according to the systematic method - Vigilance committee members' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम