वाशिममध्ये १ नोव्हेंबरपासून ‘आॅनलाईन’ नोंदणीस होणार प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:03 PM2018-10-31T17:03:38+5:302018-10-31T17:03:48+5:30

१ नोव्हेंबरपासून शेतकºयांच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस सुरूवात होत असल्याची माहिती सभापती वामनराव महाले यांनी दिली.

'Online' registration will start from November 1 in Washim! | वाशिममध्ये १ नोव्हेंबरपासून ‘आॅनलाईन’ नोंदणीस होणार प्रारंभ!

वाशिममध्ये १ नोव्हेंबरपासून ‘आॅनलाईन’ नोंदणीस होणार प्रारंभ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सोयाबिन, मूग आणि उडीद या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकºयांना ‘नाफेड’कडे आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनने वाशिम तालुका खरेदी-विक्री संघास परवानगी दिली आहे. त्यानुसार, १ नोव्हेंबरपासून शेतकºयांच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस सुरूवात होत असल्याची माहिती सभापती वामनराव महाले यांनी दिली.
वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने गतवर्षी हमीदराने खरेदी केलेल्या तूर, हरभरा, सोयाबिन या शेतमालापोटी शेतकºयांना देय असलेले चुकारे काही कारणास्तव प्रलंबित होते. दरम्यान, संस्थेचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव इंगोले यांनी वरिष्ठ पातळीवर सलग पाठपुरावा केल्याने शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरू झाले आहे. त्यामुळे आता नव्याने शेतकºयांनी मनात कुठलाही संभ्रम न ठेवता तालुका खरेदी-विक्री संघाकडे शेतमालाची ‘आॅनलाईन’ नोंदणी करून त्यानुसार माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन इंगोले यांनी केले. 
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी आमदार लखन मलिक यांच्याहस्ते ‘आॅनलाईन’ नोंदणीस रितसर सुरूवात होणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बंडू महाले, भाजपाचे शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे, नारायणराव वानखेडे, शिवाजी वाणी आदिंची उपस्थिती राहणार आहे. शेतकºयांनीही यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: 'Online' registration will start from November 1 in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.