संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना घातल्या बांगड्या, अनेकांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:09 PM2018-08-09T20:09:31+5:302018-08-09T22:33:34+5:30

राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा गत दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. सरकारने या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला.

Many of the workers who have not participated in the strike; employees give Bengals | संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना घातल्या बांगड्या, अनेकांनी काढला पळ

संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना घातल्या बांगड्या, अनेकांनी काढला पळ

Next

वाशिम : राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा गत दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. सरकारने या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला. मात्र, 9 ऑगस्ट रोजी संपाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी महासंघाने जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत त्यांना बांगडया घातल्या. महासंघाच्या या वागणुकीमुळे संपात सहभागी न झालेले कर्मचारी खजील झाल्याचे पाहायला मिळाले. 

कर्मचारी महासंघाच्या जवळपास तिनशे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद वाशिम कार्यालयात जाऊन जे कर्मचारी कर्तव्यावर हजर होते त्यांना बांगडया घातल्या. या आंदोलनाची काही उपस्थित कर्मचाऱ्यांना कल्पना झाल्याने त्यांनी कार्यालयातून पळ काढला होता. मात्र, यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या 6 कर्मचाऱ्यांना चक्क बांगड्या भरण्यात आल्या. बांगडया भरण्यासाठी महासंघाचे कर्मचारी येत असल्याचे पाहुन बरेच कर्मचारी  कार्यालयातुन पळ काढतांना दिसून आले. तर ज्या कर्मचाऱ्यांना बांगड्या देण्यात आल्या, ते कर्मचारी खजील झाल्याचे पाहायला मिळाले. महासंघाने कामावर उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांसोबत बांगड्या घालतानाचे फोटोही काढले. 
 

Web Title: Many of the workers who have not participated in the strike; employees give Bengals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.