Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:41 PM2019-04-05T16:41:53+5:302019-04-05T16:41:56+5:30

वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे.

Lok Sabha Election 2019: Silence on Farmers' Issue! | Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. पीककर्ज वाटपातील दिरंगाई, पीकविम्यातील दिरंगाई, पीक नुकसानाच्या अनुदान वाटपातील दिरंगाई, यातील कोणत्याच मुद्यावर उमेदवारांचा फोकस दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विविध ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले असून, वाहनांसह थेट मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत. या प्रचारादरम्यान अद्यापही सार्वजनिक सभा किंवा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला नसून, कुठल्याही उमेदवाराने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ऐकिवात नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी बोंडअळी अशा समस्यांनी पुरता वैतागला असल्याने शेतकºयाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच डबघाईची झाली आहे. त्यातच या विविध नैसर्गिक संकटापोटी शासनाकडून शेतकºयांना मदत देण्यातही प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या दोन वर्षात नाफे डच्या खरेदीत शेतकºयांची प्रचंड हेळसांड झाली. शेतमाल नोंदणी आणि मोजणीस विलंब, शेतमालाच्या चुकाºयास विलंब, बाजार व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक आदि प्रकार आहेतच शिवाय नैसर्गिक आपत्तीपासून होणाºया नुकसानासाठी सुरक्षाकवच म्हणून काढलेल्या पीकविम्याचा फायदाही शेतकºयांना झाला नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी रास्तारोको आंदोलनही केले; परंतु काहीच फायदा झाला नाही. ही स्थिती असतानाही उमेदवारांच्या प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा मुद्यावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसते.

Web Title: Lok Sabha Election 2019: Silence on Farmers' Issue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.