कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:54 PM2017-09-15T19:54:07+5:302017-09-15T19:56:25+5:30

कामरगाव : मागील काही महिन्यापासून एकाच वैद्यकीय अधिका-यावर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत होता, परंतु मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मुलांची प्रकृती ठिक नसल्याने ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वाºयावर दिसून येत आहे.

Kamargaon Rural Hospital | कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर

कामरगाव ग्रामीण रुग्णालय वा-यावर

Next
ठळक मुद्देएकाच वैद्यकीय अधिका-यावर रुग्णालयाचा कारभार ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वा-यावर  

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : मागील काही महिन्यापासून एकाच वैद्यकीय अधिका-यावर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत होता, परंतु मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मुलांची प्रकृती ठिक नसल्याने ते सुध्दा रजेवर गेल्याने रुग्णालय वाºयावर दिसून येत आहे.
कामरगाव ही वाशिम जिल्ह्यातील  ग्रामीण मधील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गावाला जवळपास ४० ते ४५ खेडी जोडली असुन या सर्व गावाला कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयच आजारासाठी जवळ असल्यामुळे त्यामुळे २०० ते २५० रुग्णांची नोंद या ठिकाणी होते. सद्यसिथतीत काही शिकाऊ बी.ए.एम.एस. डॉक्टरांची प्रतिनियुक्ती कामरगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत असुन दररोज नवीन डॉक्टर कामरगाव वासीयांना  पहावयास मिळत आहे. साध्या सर्दी, खोकला, असलेल्या रुग्णांना सुध्दा अमरावती पाठविण्यात येत  असल्याने तसेच कामरगावला राष्ट्रीय महामार्ग असुन या ठिकाणी अपघात सुध्दा होत असतात. त्यामुळे अपघात ग्रस्तांना सुध्दा उपचार न करता त्यांना अमरावती पाठविण्यात येते. अशाचच घटनेत वटफळी येथील रंजना देशमुख या महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी   तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आमदार पाटणी व जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करुन ४ दिवसांसाठी  धनजहुन डॉक्टर बी.बी.लहाने यांची तोंडी आदेशावर नियुक्ती केली होती, परंतु कामरगावला  कायम स्वरुपी डॉक्टरांची गरज असुन लवकरात लवकर कायम स्वरुपी डॉक्टर द्यावे अशी मागणी आहे.

Web Title: Kamargaon Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.