मानोरा नगर पंचायत  स्थापनेमुळे नव्या जि.प.गटाकडे जनतेचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:34 PM2017-10-24T13:34:20+5:302017-10-24T13:34:52+5:30

Due to the establishment of Manora Nagar Panchayat, the attention of the public towards the new ZP | मानोरा नगर पंचायत  स्थापनेमुळे नव्या जि.प.गटाकडे जनतेचे लक्ष

मानोरा नगर पंचायत  स्थापनेमुळे नव्या जि.प.गटाकडे जनतेचे लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देजनतेचे लक्ष : कारखेडा सर्वात मोठा गट


मानोरा : दोन वर्षापुर्वी मानोरा शहरात नगर पंचायतची स्थापना झाल्यामुळे मानोरा शहर मानोरा जि.प.गटातुन वगळण्यात येईल.त्यामुळे उर्वरीत कोणत्या गटात समावेश होतो किंवा नव्याने गटाची स्थापना होते का,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा मानोरा जि.प.गट  हा मानोरा शहराचा  नगर पंचायत मध्ये समावेश झाल्याने मानोरा नाव असलेल्या जि.प.गटाचे अस्तित्व नाहीसे होणार आहे. आगामी  वर्षभरात जि.प.व पं.स. निवडणुकीचे वेध लागणार आहे. त्यामुळे मानोरा जि.प.गटामध्ये असलेल्या उर्वरीत गावांना मिळुन नवीन जि.प.गट तयार होणार किवा इतर जि.प.गटामध्ये उर्वरीत गावाचा समावेश होणार  किंबहुना इतर जि.प.गटातील गावे घेवुन नवा जि.प.गट अस्तित्वात येणार बद्दल नागरिकात, राजकीय नेत्यामध्ये चर्चा रंगत आहे. मानोरा जि.प.गटामध्ये समाविष्ठ असलेले गावे तळप बु, यशवंतनगर, बोरव्हा, कार्ली,  कारखेडा, रामतिर्थ आणि सावरगाव , सोमठाणा,  समावेश आहे. मानोरा शहर वगळते तर लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन कारखेडा सर्वात मोठे गाव आहे. त्यामध्ये तळप  बु. हा पं.स.गण आहे. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन कारखेडा हे गाव मोठे असल्याने नव्याने होणाºया जि.प.गटाला कारखेडा जि.प.गट होवु शकतो.   असेही मत जानकार व्यक्त करतांना  दिसत आहे. जुन्या मानोरा जि.प.गटामुळे मानोरा शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे मानोरा शहरातुनच जि.प.सदस्य निवडलेल्या इतर गावाचा लोकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली नाही. मानोरा शहर वगळल्याने आता समाविष्ठ गावाच्या नागरिकांना जि.प.सदस्य घेण्याची आपली संधी चालुन आली आहे.

Web Title: Due to the establishment of Manora Nagar Panchayat, the attention of the public towards the new ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.