अजंता फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन प्लांटसाठी दहा लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:00+5:302021-05-07T04:43:00+5:30

रिसोड येथे सिटी केअर हॉस्पिटल येथे नवीन उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी अजंता फाउंडेशन मुंबई शाखा रिसोडच्या वतीने दहा लाखांची ...

Donation of Rs 10 lakh for Oxygen Plant by Ajanta Foundation | अजंता फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन प्लांटसाठी दहा लाखांची देणगी

अजंता फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन प्लांटसाठी दहा लाखांची देणगी

Next

रिसोड येथे सिटी केअर हॉस्पिटल येथे नवीन उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी अजंता फाउंडेशन मुंबई शाखा रिसोडच्या वतीने दहा लाखांची भरीव देणगी देण्यात येणार आहे. याअनुषंगाने सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने रिसोड शाखा अध्यक्ष उत्तमचंद बगडिया, संस्थेचे कार्यवाहक विठ्ठलराव वसू व गौरव देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिटी केअर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. अजय पाटील, डॉ. बबेरवाल, डॉ. रवी बोरा, डॉ. अनिल तापडिया यांची उपस्थिती होती. यावेळी शाखाध्यक्ष उत्तमचंद बगडिया यांनी या कार्याचे सर्व श्रेय अजंता फाउंडेशन अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल यांना दिले आहे.

Web Title: Donation of Rs 10 lakh for Oxygen Plant by Ajanta Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.