आसेगाव येथे क्रिकेट सामन्याला प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:20 PM2017-10-22T22:20:53+5:302017-10-22T22:23:16+5:30

आसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे.

Asegaon starts a cricket match! | आसेगाव येथे क्रिकेट सामन्याला प्रारंभ !

आसेगाव येथे क्रिकेट सामन्याला प्रारंभ !

googlenewsNext
ठळक मुद्देगावकरी व पोलीस स्टेशनचा पुढाकार हजारो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे.
या सामन्याचे उदघाटन आासेगावचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच गजानन मनवर, सदस्य डॉ. शौकत खान, प्रा. ताहेर अली खान, मौलाना आझाद ऊर्दू स्कूलचे अध्यक्ष सरफराज खान, एहतेशाम पटेल, मुकद्दर खान पटेल आदींची उपस्थिती होती. पहिले बक्षीस सदस्य डॉ. शौकत अली खान यांच्यातर्फे १५ हजार रुपये, दुसरे बक्षीस सेवानिवृत्त प्राध्यापक ताहेर अली खान व सरपंच गजानन मनवर यांच्यातर्फे १० हजार रुपये, तिसरे बक्षीस ठाणेदार विनायक जाधव यांच्यातर्फे पाच हजार रुपये, चवथे बक्षीस मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष सरफराज खान, एहतेशाम पटेल व मुकद्दर पटेल यांच्यातर्फे तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मॅन आॅफ द सिरीज, मॅन आॅफ द मॅच व अन्य वैयक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत परिसरातील ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे. संचालन मोहम्मद इजहार यांनी तर आभार गुलाम नबी उल्लाह खान यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य जाहेद खान पटेल, नबी उल्लाह खान, मुजफ्फर खान, मुश्ताक कुरेशी, पुंडलिकराव ठाकरे, डॉ.मो. अशफाक, जुनैद पटेल, रहमान खान पटेल, अतिक पटेल, जावेद पटेल, परवेज असलम पटेल, गफ्फार पटेल, मो. अनिस, तनवीर पटेल, रिजवान खान, अनसार अली खान, जाकीर पटेल, इमरान मंडपवाले, कलाम कुरेशी, हारून कुरेशी, रहिम कुरेशी, रामदास बेलखेडे, मोतेबर पटेल, साजिद पटेल, साबीर पटेल, राहिल पटेल, मो. जावेद, सोहेल पटेल, मो. शाकीर, इसहाक दुकानदार, नाजिम खान, मुजम्मील टेलर, इदरिस खान, मुंतजिर शाह, दाऊद खान, नजीर शाह यांच्यासह क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती.

Web Title: Asegaon starts a cricket match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा