जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:53 AM2019-05-08T00:53:16+5:302019-05-08T00:53:22+5:30

जव्हार तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

Water supply to 23 villages in Jawhar taluka with dry, six tankers | जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

Next

जव्हार - तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शिवाय चार गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत.

तालुक्यातील खरंबा, पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जुनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
जव्हार पंचायत समितीकडे ६ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे या गावांनाही पाणी टंचाई सुरु झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याने या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे.

गत वर्षी ७ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत २३ गावंपाड्यांना झळ बसली आहे. शासकीय यंत्रणा गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गुरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसा आड पुरवठा होत असल्याने पानवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या काळात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात नापास
मोखाडा : मुख्यमंत्र्यांनी तालुक्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली. मात्र, तीन वर्षांत या योजनेच्या नावाखाली २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च होऊन देखील तालुका तहानलेलाच असल्याने जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात सप्शेल नापास झाली आहे. आज घडीला तालुक्यातील ८६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलयुक्त शिवार कागदावरच दिसत आहे.

तालुक्यात कृषी विभागाने सीसीटी, मजगी, फळ लागवड, सिमेंट नाला बांध, सिमेंट वळण बंधारा ,माती नाला बांध शेततळे, लूज बोल्डर सिमेंट नाला बांध दुरु स्ती, माती नाला बांध दुरु स्ती, गाळ काढणे, अशा विविध कामांवर २०१५ -१६ ला १०७७.४ लाख २०१६-१७ ४०९.६४ लाख तसेच २०१७-१८ मध्ये ४१.२३ लाख खर्च केला आहे. २०१५-१६ ११९,३७ लाख खर्च केले असून २०१६-१७ तसेच २०१७-१८ मध्ये वनविभागाची कामेच केलेली नाहीत.

लघुपाटबंधारे विभागाने गावतलाव, पक्का बंधारा, कोल्हापुरी बंधारा, गावातळे नुतनीकरण ,पाझर तलाव दुरु स्ती, पक्का बंधारा दुरु स्तीच्या कामांवर ३७८.६४ लाख २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात कामे झालेली नाहीत तसेच लघुसिंचन च्या मार्फत २०१५-१६ या काळात २५३.५१ लाख खर्च झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेविहिरी दुरु स्तीवर २२.५२ लाख खर्च झाला आहे. यावर गटनेते प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोष दिला आहे.

Web Title: Water supply to 23 villages in Jawhar taluka with dry, six tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.