वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:38 PM2019-07-02T23:38:34+5:302019-07-02T23:38:45+5:30

वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.

Vasayet rains continue, Virar's Viva College gets water! | वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

Next

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान ही तर मागील वर्षी ची पुनरावृत्ती म्हणत यावेळी सुध्दा वसईकर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे वसई संपूर्ण जलमय झाली आहे, यामध्ये वसई बस आगाराचे तळे झाले असून वसंत नगरी, पार्वती क्र ॉस,अंबाडी रोड,आनंदनगर ,माणकिपूर, चुळणे सनिसटी गास गावसाहित विरार, नालासोपारा अणि वसई पूर्वेस सर्वत्र पाणी साचल्याने रहिवासी व औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले आहेत. त्यातच कुठे पडझड तर वसई- विरार मध्ये या चार दिवसांत एकूण 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका, पोलीस व महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत एकूण ९१७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे तहसील विभागाने सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे वसई-विरार मधील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अनेक इमारतीच्या आवारामध्ये पाणी साचले आहे. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी विजे अभावी सलग चार दिवस टप्प्याटप्प्याने वसाहत बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार दुसºया टप्प्यातील कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी तर राज्य सरकारने शाळा ,कॉलेज आणि शासकीय निमशासकीय आदींना सार्वजनिक सुट्टी च जाहीर केली त्यामुळे बर्यापैकी जनता बाहेर दिसली नाही. पालघर,ठाणे जिल्ह्यातून वसईत या ठिकाणी चाकरमानी ये-जा करत असतात. सोमवारी -मंगळवारी सकाळी वालीव, गोखिवरे, सातिवली येथे पावसाचे पाणी साचल्याने तुरळक खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. मात्र रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने चारही बाजूला पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला वसई पूर्व स्थानक परिसर सार्वजनिक वाहनांची बºयाच वेळ प्रतीक्षा करत पावसात उभे राहावे लागले. त्यामुळे रांगच्या रांग लागली असल्याचे दिसून आले. वसई स्थानक परिसरातील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. याच पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागली. बाहेरून आलेल्या प्रवाशांची यावेळी अक्षरश: ससेहोलपट झाली.

विरार मधील विवा कॉलेज मध्ये ही पाणी घुसले !
सतत कोसळणाºया पावसामुळे विरार चे विवा कॉलेज व उड्डाणपुलाजवळ ही मोठया प्रमाणात पाणी साचले असल्याचे चित्र स्पष्ट होते,यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना गैरसोय निर्माण झाली. बोळींज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दरवर्षी पाणी साचते. यंदाही या शाळेसमोर पाणी साचल्याने दिसून आले. विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भुवन या ठिकाणीदेखील पाणी रस्त्यावर साचले आहे. तर, दुसरीकडे वसई-विरार पालिका हद्दीत चार दिवसांत एकूण २० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे अिग्नशमन विभागाचे अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

Web Title: Vasayet rains continue, Virar's Viva College gets water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.