नालासोपा-यात तीन महिलांचे केस कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:34 IST2017-08-19T05:34:27+5:302017-08-19T05:34:29+5:30

नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांत तीन महिलांचे केस कापले गेल्याचा प्रकार उजेडात आला.

Three women cut hair in Nalasopa | नालासोपा-यात तीन महिलांचे केस कापले

नालासोपा-यात तीन महिलांचे केस कापले

वसई : नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांत तीन महिलांचे केस कापले गेल्याचा प्रकार उजेडात आला. यातील एक मुलगी दहावीत असून दोन विवाहिता आहेत. मंगळवारी आचोळे डोंगरी येथील दहावीतल्या अंगुली यादव हिचे केस कापले गेल्याचे उजेडात आले. त्यानंतर बुधवारी नालासोपाºयातील धानीब बाग येथे राहणाºया शबाना बानू यांचे केस कापले गेल्याचे बुधवारी पहाटे निदर्शनास आले. केस कापले गेल्याच्या भीतीने शबाना बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
बुधवारी सकाळीच वालईपाडा येथे राहणाºया बिनादेवी यादव यांचे केस कापले गेले. बिनादेवी सकाळी मुलाला दूध पाजण्यासाठी उठल्या असता केस कापल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीस तक्रार झाली नसली, तरी पोलिसांनी महिलांच्या घरी जाऊन चौकशी केली आहे.

Web Title: Three women cut hair in Nalasopa