कन्येवर बलात्कार, पित्यास अटक, तीन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:33 IST2017-12-09T00:33:31+5:302017-12-09T00:33:55+5:30

सुभाष तुळशीराम मोरे हा नराधम पिता पोटच्या १३ वर्षीय मुलीवर गेली चार वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतमधील वसरे पाडा येथे घडला आहे

Rape of daughter, father arrested, three-day custody | कन्येवर बलात्कार, पित्यास अटक, तीन दिवसांची कोठडी

कन्येवर बलात्कार, पित्यास अटक, तीन दिवसांची कोठडी

नंडोरे : सुभाष तुळशीराम मोरे हा नराधम पिता पोटच्या १३ वर्षीय मुलीवर गेली चार वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतमधील वसरे पाडा येथे घडला आहे. हा नराधम ती तिसरीत असल्यापासून कोयत्याचा धाक दाखून तिच्यावर गेली ४ वर्षे लैंगिक अत्याचार करत असल्याचेही समोर आले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
ती ७ वीत शिकत होती. महिनाभरापूर्वी तिला वडिलांनी तिचे शाळेत जाणे बंद केले होते.त्यानंतर ती आपल्या मामाच्या घरी राहायला गेली होती. ती खडकोली येथील जंगलात गुरुवारी दुपारच्या सुमारास सरपण आणण्यासाठी गेली
होती.
संध्याकाळच्या वेळी या नराधमाने कोयत्याचा धाक दाखवून तिला तेथे असलेल्या पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ती घरी आल्यानंतर तिला त्याने घरात कोंडून बाहेरून कुलूप लावले. बाहेर पडण्यासाठी ती करीत असलेला आक्रोश तिच्या मामीने एैकताच तिने दरवाजा उघडून तिला बाहेर काढले. तिने घटना तिच्या नातेवाइकांना सांगितली. लागलीच त्यांनी तिला पालघर पोलीस ठाण्यात आणले तिने स्वत: नराधमाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
याआधी ही या नराधमाने ती तिसरीत असल्यापासून कोयत्याचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात आढळून आले
आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुभाष तुळशीराम मोरे यास अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पॉक्सो अन्वयेही गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही मुलगी पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहे. तुळशीराम हा गुंड असून याआधीही त्याने कारावास भोगला असल्याचे सांगितले जाते. त्याला या प्रकारात अन्य कोणाची साथ अथवा फूस होती काय याचाही तपास सुरु आहे.
याप्रकरणी पालघर पोलीस निरीक्षक किरण कबाडी ,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रु पाली गुंड व पोलीस हवालदार डि . आर. गावित हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Rape of daughter, father arrested, three-day custody