एसटीला राखी बांधून मुंबई सेंट्रल आगारात रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:15 AM2018-08-27T05:15:02+5:302018-08-27T05:16:29+5:30

महिला कर्मचाऱ्यांचा पुढाकार : आगार व्यवस्थापकांची उपस्थिती

Rakshabandhan Mumbai Central Jail | एसटीला राखी बांधून मुंबई सेंट्रल आगारात रक्षाबंधन

एसटीला राखी बांधून मुंबई सेंट्रल आगारात रक्षाबंधन

googlenewsNext

मुंबई : देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह जोर धरत असताना, एसटी मुख्यालयात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. विविध आंदोलनात होणाºया नुकसानीनंतरदेखील तातडीने एसटी सेवा पूर्ववत करण्यात येते, यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुंबई सेंट्रल आगारातील कर्मचाºयांनी थेट एसटीला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

राज्यातील विविध आंदोलनात सर्वप्रथम लक्ष्य एसटीला करण्यात येते. यामुळे एसटी महामंडळाच्या एसटीचे नुकसान होते, शिवाय महामंडळाला उत्पन्नावरदेखील पाणी सोडावे लागते. आंदोलनकर्त्यांकडून काही तासांत एसटीची तोडफोड करण्यात येते. मात्र, प्रवाशांना आणि महामंडळाला त्याचे परिणाम अनेक महिने भोगावे लागतात. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ यानुसार राज्याच्या कानाकोपºयात एसटी पोहोचून प्रवाशांना सेवा पुरविते.
अतिदक्षतेच्या वेळेतही एसटी कर्मचारी पोलिसांप्रमाणे कार्यरत असतात. सणाच्या वेळी आप्तस्वकीयांची उणीव भासू नये, यासाठी मुंबई सेंट्रल आगारातील कर्मचाºयांनी विधी पवार, लक्ष्मी शेलार, स्मिता सकपाळ, जयश्री कुंभारकर या महिला कर्मचाºयांनी मुंबई-स्वारगेट मार्गावरील एसटीला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. आंदोलनात समाजकंटकांकडून एसटीची तोडफोड करण्यात येते. याचा परिणाम सर्व सामान्यांसह महामंडळाला भोगावे लागतात. यामुळे मुंबई सेंट्रल आगारात आगार व्यवस्थापक सुनील पवार यांच्या उपस्थितीत कर्मचाºयांनी एसटीला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केल्याचे मुंबई आगार प्रभारक श्रीरंग बरगे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rakshabandhan Mumbai Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.