पालघर जिल्ह्यात सर्वत्र संततधार! अनेक ठिकाणी साचले पाणी, चाकरमान्यांची रखडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:14 AM2019-06-29T00:14:48+5:302019-06-29T00:32:02+5:30

पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने एकीकडे शेतकरी वर्ग सुखावला गेला असतांना दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या डहाणू-पालघर दरम्यानच्या मुंबईकडे (अप) जाणाऱ्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन गाड्या उशिराने धावत होत्या.

Palghar district is everywhere! Studded water in many places, sticks of sticks | पालघर जिल्ह्यात सर्वत्र संततधार! अनेक ठिकाणी साचले पाणी, चाकरमान्यांची रखडपट्टी

पालघर जिल्ह्यात सर्वत्र संततधार! अनेक ठिकाणी साचले पाणी, चाकरमान्यांची रखडपट्टी

Next

- हितेंन नाईक
पालघर - जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने एकीकडे शेतकरी वर्ग सुखावला गेला असतांना दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या डहाणू-पालघर दरम्यानच्या मुंबईकडे (अप) जाणाऱ्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन गाड्या उशिराने धावत होत्या. तर अनेक भागातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र आज कुठेही जीवित वा वित्तहानीची घटना घडली नसल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या विचाराने जिल्हा प्रशासन धास्तावले होते. आकाशात जमणारे काळे ढग पाऊस न पाडताच पुढे निघून जात असल्याने आपल्या शेतात पेरणी केलेला शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. जिल्ह्यात एकूण भात लागवडीचे ७७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून ६० टक्के क्षेत्रात पेरणीचे तर २० हजार हेक्टर क्षेत्रात नागली व वरई लागवडीचे काम पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी तरकसे ह्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पालघर दरम्यानच्या स्थानकातील रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचून राहिल्याने दुपारी ११.३० ते १ वाजे दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन राजधानी एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. पालघर स्थानकातील पोल क्र मांक १३ ते १७ या दरम्यान जास्त प्रमाणात पाणी साचल्याने अनेक कर्मचाºयांनी धाव घेत हे साचलेले पाणी दूर केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली.

पालघर नगरपरिषद क्षेत्रात माहीम रोड, टेंभोडे रोड, जुना पालघर भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांचा अंदाज चुकल्याने गाड्या गटारीच्या चेंबरमध्ये अडकल्या तर शहरातील सर्व पाणी पानेरी नदीद्वारे समुद्राला मिळत असल्याने पानेरी नदीच्या होणाºया प्रदूषणाला नगरपरिषदेला जबाबदार धरीत पाणेरी बचाव संघर्ष समितीने नगरपरिषदेचे दूषित पाण्याचे स्त्रोत भराव टाकून अडवून ठेवले आहे. त्यामुळे आज अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. पहाटेपासून धुवाँधार सुरू असणाºया पावसाने दुपारी काही काळासाठी उसंत घेतली असली तरी ४.३० वाजल्यानंतर पावसाने मोठा जोर धरल्याने पाणी साचण्याच्या प्रकारात वाढ झाल्यास वित्तहानीच्या घटना घडू शकतात. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असून कुठेही जीवित वा वित्तहानीच्या घटना घडल्या नाहीत.

वसईत जोरदार हजेरी, मार्ग जलमय, नागरिकांची तारांबळ
पारोळ- वसईत उशिराने आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही कोसळधार सुरूच होती. मार्गालगत बांधकामे करून पाण्याची वाट बंद केल्याने पहिल्या पावसातच शिरासाड अंबाडी, विरारफाटा विरार, सोपारा फाटा ते नालासोपारा या मार्गावर पाणी आले यामुळे या मार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती. तर अचानक आलेल्या पावसाने नोकरदार वर्गाची मोठी तारांबळ उडाली तर बळीराजावर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट असताना या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.

वसईत ७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वेळी २७ जूनपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसानंतर शेतामध्ये राब टाकण्यात आला होता; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने राब करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी बळीराजा सुखावला आहे. पाऊस बरसल्याने दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे. यामुळे शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
तालुक्यातील भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहाटेपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे. यामुळे नोकरीला जाणाºयांची व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, नंतरच्या काळात गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, गुरुवारी, शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे थोडा का होईना पण शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. वसई, विरार, नालासोपारा, परिसरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळे नालेसफाईचा दावा फोल ठरला.
 

Web Title: Palghar district is everywhere! Studded water in many places, sticks of sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.